सिंधूताई सपकाळ, बाबा आमटे यांनी ज्याप्रकारे समाजसेवेसाठी आपल जीवन व्यतीत केले त्याप्रमाणे जायंट्स गृप ने त्याचा आदर्श घेऊन समाजाची सेवा करावी आणि तसे केल्यास समाजात बदल होऊ शकतो असे उदगार गुरुप्रसाद पावसकर यांनी जायंट्स गृप ऑफ थिवि च्या अधिकारग्रहण प्रसंगी काढले.
पेडे येथे जायंट्स गृप ऑफ थिवि च्या शपथ ग्रहण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर फेडरेशन दहा चे अध्यक्ष उमेश नाईक, केंद्रीय समिती सदस्य वर्षा नाईक, जायंट्स गृप थिवि चे नुतन अध्यक्ष सुधीर रीवणकर, शपथ ग्रहण अधिकारी राजीव कदम, माजी अध्यक्ष निलेश होडारकर, आदी उपस्थित होते.
याप्रसंगी शपथ ग्रहण अधिकारी राजीव कदम यांनी नुतन अध्यक्ष सुधीर रीवणकर व त्यांच्या संचालक मंडळाला शपथ दिली. नुतन अध्यक्ष_ सुधीर रीवणकर, उपाध्यक्ष_ सतीशचंद्र पास्ते, किशोर सावळ, लता पुजारी, हेमा देशपांडे, संचालक मंडळ_ केशव देशपांडे, विजयालक्ष्मी होनवाड, यावेळी नुतन सदस्य करूणा सावळ, सुजीत शिरोडकर, प्रशांत परब यानाही शपथ देण्यात आली.
यावेळी नूतन अध्यक्ष सुधीर रीवणकर यांनी आपण आगामी वर्षात समाजासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी वर्षा नाईक यांनी जायंट्स गृप थिवि ला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुची सावंत तर सतीशचंद्र पास्ते यांनी आभार मानले.
फोटो –
जायंट्स गृप आफ थिवि च्या अधिकारग्रहण प्रसंगी गुरुप्रसाद पावसकर, नूतन अध्यक्ष सुधीर रीवणकर , उमेश नाईक व संचालक मंडळ.
सिंधूताई सपकाळ, बाबा आमटे यांनी ज्याप्रकारे समाजसेवेसाठी आपल जीवन व्यतीत केले त्याप्रमाणे जायंट्स गृप ने त्याचा आदर्श घेऊन समाजाची सेवा करावी आणि तसे केल्यास समाजात बदल होऊ शकतो असे उदगार गुरुप्रसाद पावसकर यांनी जायंट्स गृप ऑफ थिवि

.
[ays_slider id=1]