गोव्यातील युवकांचे इंटेरियर एक्झिबिशन -जेडी डिझाईन पुरस्कार २०२३

.

गोव्यातील युवकांचे इंटेरियर एक्झिबिशन -जेडी डिझाईन पुरस्कार २०२३

 

 

उदयोन्मुख युवा डिझाईनर्ससाठी जेडी डिझाईन पुरस्कार हे प्रथम व्यासपीठ आहे. आपल्या सभोवताली जगाचे दृष्य स्वरूपात सादरीकरण करण्यास युवकांना संधी मिळते. सतत बदलत जाणाऱे डिझाईन आणि सर्जनशील व रमणीय भूप्रदेशाला प्रतिसाद देत असताना, डिझाईन पुरस्कार सर्जनशील युवकांना व्यापक जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच सहजरीत्या गुंतवून मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांसमोर नेत असतात.

देशाच्या विविध राज्यांमध्ये डिझाईन पुरस्कार सोहळे आयोजित केले जातात, ज्यांची सुरवात एप्रिल २०२३ मध्ये होत आहे. या इंटेरियर डिझाईन प्रदर्शनाचा पडदा किनारे आणि सुर्यकिरणांनी व्यापलेल्या गोव्यात १८ एप्रिल २०२३ रोजी पणजी जिमखाना येथे उघडणार असून, सकाळी १० ते संध्याकाळी ६.३० पर्यंत ते खुले असेल.

आजचे युवक हे बदलाचे वाहक असून परिणामकारक व प्रगत उद्यासाठी ते नव्या विचाराच्या लाटेने भारले गेले आहेत. आपली क्षमता आणि आत्मविश्वास याची जाणीव करून घेण्याची संघी युवा इंटेरियर डिझायनरला यानिमित्त लाभणार आहे. युवकांना पाठिंबा देण्यासाठी अशा उपक्रमाला तज्ज्ञ, पुरस्कर्ते, स्टेकहोल्डर्स आणि प्रसार माध्यमाचे सहकार्य लाभत आले आहे.

जेडी स्कूल ऑफ डिझाईन आणि जेडी इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी यांच्यात जेडी डिझाईन पुरस्कारासाठी चढाओढ लागेल. आपल्या कल्पक कृतीने जे सादरीकरण केले जाईल, त्यात प्रगत विचारांच्या अलौलिक बुद्धिमत्तेचे दर्शन घडणार आहे. या सादरीकरणातून आकर्षक अशी कलाकृतींचे अन्वेषण होणार असून, प्रेरणादायी व अंतर्मनाची साथ मिळून इतिहासाला कलाटणी देणाऱ्या नायकांचा व समयाचा सम्नान त्याद्वारे होणार आहे.

या व्यासपीठाचा उद्देश गोव्यातील युवकांना प्रेरणा देणे हा असून, जेडीडीए चा सोहळा युवकांमधील गुणांची वाढ व्हावी आणि त्यांना अशा उद्योगाचा अनुभव यावा, असा आहे. या उद्योगांमध्ये असलेल्या विविध संधींची जाणीव त्यांना होणार आहे.

 

जेडी पुरस्कार देण्यामागे, युवकांमधील कला विकसित करणे आणि नव्या गुणांना वाव देत त्यांना प्रकाशझोतात आणणे हाच हेतू आहे. फॅशन उद्योगातील सुक्ष्म बारकावे समजून घेण्याची ही पायरी असून, सादरीकरण कसे करावे याचे ज्ञान मिळण्याचे हे व्यासपीठ आहे, असे जेडी स्कूल ऑफ डिझाईन आणि जेडी इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजीचे व्यवस्थापकीय विश्वस्त नीलेश दलाल यांनी म्हटले आहे.

 

प्रकाशझोतात असलेले इंटेरियर डिझायनर्स

ऐश्वर्या श्रीशैल मिर्जे-कुणबी वारसो

आरुषी राहुल साखरदांडे-पॉज अँड क्लावज

आर्या राजेश पाटील-पॉप ईट अप

क्लिंता विसेलीन क्रास्टो-सावदाद बायोफिलीया

धनश्री प्रतापसिंग राजपूत-सॉईल टू सोल

ईमान्युयल आंतोनियो फर्नांडिस-ओल्ड वर्ल्ड चार्म

मेलिता फ्लेसी कार्वालो-झिरो वेस्ट,झिरो वाँट

स्नेषा सुनील मांद्रेकर-सियोलफूल डायनिंग

योवन वान्लालरेंतुआंगी खियांगते-डी नेचर्स प्राईड

पर्ल एन डिसोझा-रिस्टोर, रिनोव्हेट, रिफर्ब

धुरी ईशा शुभाजीत-तपोवन रिट्रीट सेंटर

शाहीन कौसर बशीर अहमद बेल्लुर-रेनबो डेझलर्स

फर्नांडिस एल्टन फ्रान्सिस्को-इंडस्ट्रियल डिनेट

नाईक तेजा दयानंद-सोबीत निर्मीती

कॅरन मारयान आल्बुकेर्क-कॅफिट

क्रेसिदा रोझिआन लोबो-मॉडर्न ऑफलाईन बँकिंग

तेजस फडते-पोदेरालो कोन्सो

वायदे फ्रान्सिस्को डि सा-रिफ्लेक्शन

सांचिया डिसोझा-यांत्रास

मानसी कुऱ्हाडे-बडजी सेट्टी

नाओमी कार्दोज, डिलीमा डायस व जेड फर्नांडिस-क्लिओवेदा

एस्मिरा क्रास्टो, मेगान डिकॉस्टा व स्नेदन आल्मेदा-तातामी

यश सावर्डे, शांता परेरा व अनुषा प्रभुतेंडोलकर-आमचे गोवा

 

आणि यांचेही कला सादरीकरण

 

मेलरॉय मास्कारेन्हस, पराग नाईक व रामकरण वर्मा- फ्रिक ऑफ नेचर

वानेसा आल्वारिस, सिमरन पेरेरा, जुआन मोता, शोभा के.सी., स्वीना कुलासो, वैष्णवी मांद्रेकर, विविना नाईक, मारयान दोरादो, जुवेला मिरांदा, खातुन पन्ना, सोनल परब आणि अनुषा शेट्टी-कारिगरकृती

सिलेन जॉर्ज, कालिस्टा पेरेरा, तायशा परेरा-ला बेला सिमोनेट्टा

संजना गुरव, शेरल फर्नांडिस,मिनाझ शेख व मेहल परब-ग्रेंदर ऑफ मिस्र

बेबर्ली आल्मेदा, सर्वेक्षा राणे, आयुष्का कोटे व जेनिस बोतेल्हो-जॉझफिन ला ब्युटी

 

खालील शहरांत लवकरच येत आहे..

विजयवाडा-२८ एप्रिल २०२३

पुनियागुट्टा-३० एप्रिल २०२३

कोचिन-मे २०२३

बंगळुर-जून २०२३

 

 

जेडी इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी या विषयी-

जेडी इंस्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नोलॉजी या संस्थेने १९८८ साली स्थापनेनंतर अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. वाढत्या बाजारपेठेत पुरवठा करण्यासाठी जेडी इंस्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीने डिझाईन, व्यवस्थापन, तंत्रज्ञान व कला क्षेत्रात विविध अभ्यासक्रम सुरू केले आहेत. भविष्यात या उद्योगासाठी नामवंत कलाकार देण्यासाठी ही संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

Website: https://www.jdinstitute.edu.in/

 

 

जेडी स्कूल ऑफ डिझाईन विषयी-

डिझाईन, कला व प्रसार माध्यम या क्षेत्रात सृजनशीलतेला वाव देणाऱ्याचे सहकार्य घेत जागतिक दर्जाचे शिक्षण देत कुशल डिधायनर घडविण्याचे कार्य जेडी स्कूल ऑफ डिझाईन करीत आले आहे. गोवा विद्यापीठ आणि बंगलोर शहर विद्यापीठाशी संलग्न होत आणि सिंघानिया विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हे विद्यालय नव्या युगाचे शैक्षणिक उपक्रम राबवीत आहे.

Website: https://www.jdsd.in/

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar