श्री. शांता विद्यालयाचा खास उन्हाळी शिबिर

.

श्री. शांता विद्यालयाचा खास उन्हाळी शिबिर

विद्याभारती संचालित सडये -शिवोली येथील श्री . शांता विद्यालयामध्ये विध्यार्थ्यांच्या सर्वागिण विकासाच्या उद्देशाने खास उन्हाळी शिबिराचे आयोजन मुख्याध्यापिका सौ.प्रजिता सांगाळे व शिक्षक श्री. संगम चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. हे शिबिर गणेशनगर येथील गणेश मंदिरामध्ये व श्री. शांता
विद्यालयामध्ये आयोजित करण्यात आले. हे शिबिर श्री. शिवशंकर मयेकर यांच्या द्वारे पुरस्कृत करण्यात आले.या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विविध उपयुक्त विषयांवर कार्यशाळा घेण्यात आली.प्रत्येक विषयाचे तज्ञ या कार्यशाळांसाठी लाभले होते. हस्ताक्षरकला कार्यशाळा ही श्री मोहन खवणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली तसेच चित्रकला कार्यशाळेसाठी विषय तज्ञ म्हणून श्री. साहिल लोटलीकर लाभले होते .वैदीक गणितातील सोपे सरल पद्धती श्री प्रज्वल साळगावकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या तसेच आश्चर्यकारक विज्ञान प्रकल्प सादरीकरण शिक्षिका प्रणया गावकर यांनी केले.तसेच श्री. मुकुंद कवठणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कथाकथन कार्यशाळा घेण्यात आली.शिक्षिका कु.रक्षंदा आमोणकर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी नृत्याविष्काराचा आनंद लुटला . विद्यार्थ्यांना संस्कृत भाषेचें ज्ञान मिळावे यासाठी शिक्षक उमेश महालकर, कु आरती गावस श्री. संगम चोडणकर,सौ.अक्षता सावंत, श्री कपिल वझे यांनी संस्कृत वर्गाचे आयोजन केले होते.

शिक्षक श्री जगदीप कारापुरकर यांनी विद्यार्थ्यांना हस्तकलेचे शिक्षण दिले तसेच शिक्षिका सौ जागृती गावकर यांनी भारतीय संस्कृती संवर्धक प्रार्थना सञाचे आयोजन केले होते
या शिबिराच्या समारोप सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवशंकर मयेकर लाभले होते त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपञके देण्यात आली तसेच मुकुंद कवठणकर सन्मानिय अतिथी म्हणून श्री लाभले होते त्यांनी समारोपीय भाषण सादर केले. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar