मुळगाव, डिचोली येथील श्री. अजय कोठावळे, गोवा कॉलेज ऑफ आर्टमधून पदवीधर आणि गेली २५ वर्षे चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २३ एप्रिल २०२३ रोजी गोवा मनोरंजन सोसायटी येथील कला दालनात ‘कनेक्टेबल डिफरेन्सेस’ या नावाने त्यांच्या नवीन कलाकृतींचे प्रदर्शन

.

मुळगाव, डिचोली येथील श्री. अजय कोठावळे, गोवा कॉलेज ऑफ आर्टमधून पदवीधर आणि गेली २५ वर्षे चित्रकलेच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. २३ एप्रिल २०२३ रोजी गोवा मनोरंजन सोसायटी येथील कला दालनात ‘कनेक्टेबल डिफरेन्सेस’ या नावाने त्यांच्या नवीन कलाकृतींचे प्रदर्शन भरवत आहेत.

अजय कोठावळे यांना ‘बार्नबस आर्ट्स हाऊस’ न्यूपोर्ट, साउथ वेल्स, यूके येथील प्रसिद्ध कला दालनात आमंत्रित करण्यात आले आहे. महिनाभराच्या आर्ट रेसिडेन्सीमध्ये ते कला कार्यशाळा, चर्चासत्रे, भित्तीचित्रे आणि न्यूपोर्टमधील कलाकार, विद्यार्थी व स्थानिकांसोबत काम करण्यात गुंतलेले असतील. या निवसादरम्यान त्यांच्या नवीन कलाकृतींचे प्रदर्शन ९ मे ते ९ जून २०२३ या कालावधीत ‘बार्नबस आर्ट्स हाऊस’ येथे आयोजित करण्यात आले आहे.

तत्पूर्वी, गोव्यातील सर्व कलाप्रेमी व सर्वसामान्य जनतेला या नवीन कलाकृतींचा आस्वाद घेता यावा यासाठी त्यांनी २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत कला दालन, गोवा मनोरंजन सोसायटी पणजी येथे प्रदर्शन भरवण्याचे ठरविले आहे. यानिमित्त सर्वांना या प्रदर्शनास आवर्जून भेट देण्याचे आवाहन चित्रकार अजय कोठावळे यांनी केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar