लहान मुलांच्या शिक्षणातील #इन्व्हिसिबल गॅप वर प्रकाश टाकणारे अभियान सुरु

.

लहान मुलांच्या शिक्षणातील #इन्व्हिसिबल गॅप वर प्रकाश टाकणारे अभियान सुरु

पणजी: पीअँडजी शिक्षा या पीअँडजी इंडियाच्या फ्लॅगशिप सीएसआर कार्यक्रमाने ‘इन्विजिबल गॅप’ असे संबोधित केल्या जाणाऱ्या छुप्या समस्यांवर प्रकाश टाकण्यासाठी अशा प्रकारचे पहिलेच राष्ट्रव्यापी अभियान सुरू केले आहे. मुंबईतील एका प्रभावी समूहाद्वारे हे अभियान राबवले जात आहे. शालेय विद्यार्थी त्यांच्या वर्गातील अन्य मुलांच्या शिक्षणाच्या वेगाशी जुळवून घेताना अनेकदा मागे पडतात, असे अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. एक संकल्पना, एक विषय, एक वर्ग यांमुळे मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. कारण त्यामुळे लहान मुलाद्वारे संकल्पनांच्या पायाभूत आकलनात अंतर पडू शकते. जेव्हा मूल मागे पडते आणि निश्चित अभ्यासक्रमातील अपेक्षित अध्ययन स्तराशी मुलाचा वर्तमान अध्ययन स्तर सुसंगत नसतो, तेव्हा अदृश्य अशी दरी तयार होते.

‘ब्रिजिंग इन्विजिबल गॅप्स (अदृश्य अंतरे भरून काढताना)’ या विषयाला केंद्रस्थानी ठेवून एक चर्चा घेण्यात आली. लेखिका व माजी पत्रकार प्रियंका खन्ना यांच्या सूत्रसंचालनांतर्गत घेण्यात आलेल्या या चर्चेत, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री शेफाली शहा, पीअँडजी इंडियाच्या ब्रॅण्ड ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष गिरीश कल्याणरामन, एज्युकेशनल इनिशिएटिव्ह्जचे सहाय्यक उपाध्यक्ष रितेश अगरवाल आणि सिरमौर (हिमाचलप्रदेश) जिल्ह्यातील बानाह की सर येथील सरकारी माध्यमिक विद्यालयातील गणित शिक्षक सागर सिंग सहभागी झाले होते. #इन्व्हिसिबल गॅप म्हणजे काय हे स्पष्ट करताना या सर्वांनी काही विचारप्रवर्तक माहिती मांडली आणि याचा मुलांवर किती लक्षणीय परिणाम होतो हेही स्पष्ट केले. ही मुले कायमस्वरूपी झगडत राहतात आणि त्यांना योग्य ते सहाय्य न मिळाल्यामुळे शाळा सोडतात किंवा त्यानंतरच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना त्यांना करावा लागतो. या दऱ्या भरून काढण्यामध्ये शिक्षक, उद्योगक्षेत्र व समाज यांच्यासह सर्व संबंधितांनी काय भूमिका बजावली पाहिजे आणि भारतातील प्रत्येक मुलाला संकल्पनांचे आकलन होऊन ते शिकले पाहिले याची निश्चिती कशी केली पाहिजे यावर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, पीअँडजी शिक्षातर्फे अशा प्रकारचा पहिलाच अभियानपट (कॅम्पेन फिल्म) प्रदर्शित करण्यात आला. बिंदिया या छोट्या मुलीच्या विचारप्रवर्तक कथेच्या माध्यमातून ‘इन्विजिबल गॅप’ या समस्येवर या फिल्ममध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. बिंदिया या समस्येने ग्रस्त असते आणि तिला वर्गातील शिकवण्याशी जुळवून घेण्यासाठी झगडावे लागत असते.

पीअँडजी इंडियाच्या मार्केटिंग ऑपरेशन्स विभागाचे उपाध्यक्ष गिरीश कल्याणरामन या नवीन फिल्मबद्दल म्हणाले, “पीअँडजी शिक्षाची स्थापना १८ वर्षांपूर्वी झाली आणि तेव्हापासून हा उपक्रम लक्षावधी वंचित मुलांना शिक्षणाच्या संधी पुरवण्यासाठी अविश्रांतपणे काम करत आहे. अशा प्रकारचे पहिलेच अभियान आणि बिंदियाची गोष्ट यांद्वारे आम्ही हा प्रवास पुढे नेत आहोत. राष्ट्रव्यापी जागरूकता निर्माण करण्याच्या आणि आपल्या देशातील कोट्यवधी मुलांवर परिणाम करणाऱ्या या अदृश्य अंतरांबाबत अर्थपूर्ण कृतीचे आवाहन करण्याच्या उद्दिष्टाने हे अभियान राबवले जात आहे. मूल जेव्हा मागे पडते किंवा त्याचा/तिचा वर्तमान अध्ययन स्तर अपेक्षित स्तराशी मिळताजुळता नसतो, तेव्हा ते खोडसाळपणा करत आहे किंवा त्याला शिकण्यात रस नाही असे गैरसमज करून घेतले जातात पण या गैरसमजांखाली अनेकदा या अदृश्य अंतरांची लक्षणे दडलेली असतात. ती लक्षणे सर्वांपुढे आणणे हे आमचे उद्दिष्ट आहे.हे अंतर भरून काढण्यासाठी पीअँडजी विविध उपक्रमांच्या माध्यमातून अनेक सहयोगींसह काम करत आहे. मशिन लर्निंगवर आधारित प्रगत साधनांचा लाभ घेण्यापासून ते समुदाय स्तरावरील अध्ययन शिबिरांपर्यंत अनेक उपक्रमांचा यात समावेश आहे. आम्ही ही समस्या मुळापासून सोडवण्यासाठी काम करत आहोत आणि या अभियानापासून प्रेरणा घेऊन प्रत्येक जण आपल्या आजुबाजूच्या मुलांमधील ही अंतरे शोधून काढण्यासाठी तसेच ती भरून काढण्याच्या दृष्टीने आवश्यक ते उपाय करण्यासाठी प्रेरित होईल, अशी आशा आम्हाला वाटते.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar