प्रत्येक मूडनुसार 10 नवीन पिझ्झा लाँच करण्याकरिता पिझ्झा हट’मध्ये सैफ अली खान आणि शहनाज गिल यांचा सहभाग

.

*प्रत्येक मूडनुसार 10 नवीन पिझ्झा लाँच करण्याकरिता पिझ्झा हट’मध्ये सैफ अली खान आणि शहनाज गिल यांचा सहभाग*

24 एप्रिल 2023: पिझ्झा हट, भारतातील प्रचंड लोकप्रिय आणि विश्वासार्ह पिझ्झा ब्रँड 10 नवीन पिझ्झाचे विविध प्रकार लाँच करत असून ते ग्राहकांच्या प्रत्येक संभाव्य मूडशी जुळणारे आहेत. एका रोमांचक मसालेदार किकचा शोध असो किंवा त्यांना हवासा वाटणारा चपखल आराम असो, पिझ्झा हट ग्राहकांसाठी अप्रतिम चवीचे पिझ्झा घेऊन दाखल झाली आहे, ज्यामुळे केवळ त्यांच्या जिभेचे चोचले पूर्ण होणार नाही तर खवय्यांचा मूड देखील संतुष्ट करेल. ब्रँडने ‘मूड बदले, पिझ्झा बदले’ मोहिमेद्वारे या श्रेणीला प्रोत्साहन देण्यासाठी मेगास्टार सैफ अली खान आणि शहनाज गिल यांना सामील करून घेतले आहे. ही मोहीम आपल्या सतत बदलत राहणाऱ्या मूडवर लक्ष केंद्रित करते आणि त्यासोबतच आपली खाण्याची इच्छा देखील बदलते. नवीन श्रेणी भारतातील सर्व 800 पिझ्झा हट स्टोअर्समध्ये डाईन-इन, डिलिव्हरी आणि टेकअवेमध्ये उपलब्ध असेल.ज्याच्या किंमती दोन पर्सनल पिझ्झासाठी रु. 299 पासून सुरू होतील.

पिझ्झा हटच्या नवीन रेंजमध्ये मजेदार माखनी पनीर, धाबे दा किमा, चीझी मशरूम मॅजिक, मेक्सिकन फिएस्टा, अप्रतिम अमेरिकन चीझी आणि नवाबी मुर्ग माखनी यांसारख्या 10 रोमांचक आणि अद्वितीय फ्लेवर्सचा समावेश आहे. मुबलक टॉपिंग्सने भरलेले, मिंट मेयो आणि टेक्सास गार्लिक यांसारख्या अत्यंत आवडत्या ग्लोकल फ्लेवर्समध्ये खास तयार केलेल्या सॉससह पिझ्झा आणखी आनंददायी आणि भूक शांत करणारे असल्याने त्यांना कायम पसंती देण्यात येईल. ब्रँडने भारतीयांना आकर्षित करण्यासाठी माखनी सॉस सादर केला आहे. श्रेणीचे सर्व फ्लेवर विशेषतः पिझ्झाला उत्कंठावर्धक बनवण्यासाठी तयार करण्यात आले आहेत – मग मजेदार माखनी पनीरच्या बेसवर वापरलेला बटरी माखनी सॉस असो किंवा चीझी मशरूम मॅजिकचा क्रीमी, ओघळणारा आणि चीझी बेस सॉस आणि त्यासोबत निराळ्या चवीचे मशरूम आणि ऑलिव्ह स्वाद असो.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar