गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात आचार्य वर्गासाठी चालवण्यात येणाऱ्या ‘होराभूषण कै.वसुधा रघुनाथ वाटवे स्मृती वाचन साधना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या पर्वाचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ०९.३० वाजता

.

गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात आचार्य वर्गासाठी चालवण्यात येणाऱ्या ‘होराभूषण कै.वसुधा रघुनाथ वाटवे स्मृती वाचन साधना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या पर्वाचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार दि.२६ एप्रिल रोजी सकाळी ०९.३० वाजता विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो हे प्रमुख अतिथी म्हणून,तर सुप्रसिद्ध मराठी कवयित्री डॉ.अनुजा जोशी या सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रकल्पाचे प्रायोजक अतुल‌ वाटवे,’विद्या भारती, गोवा’ चे अध्यक्ष डॉ.सीताराम कोरगांवकर,संरक्षक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, विद्यालयाचे व्यवस्थापक पुरुषोत्तम कामत व प्राचार्य गजानन मांद्रेकर हे या सोहळ्यास उपस्थित असतील.
आचार्यांना नियमित वाचन करण्याची सवय लागावी या उद्देशाने गेल्या शैक्षणिक वर्षापासून चालविण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत विद्यालयाच्या प्राचार्यासहीत सर्व आचार्य व लिपीक जून ते मार्च या दहा महिन्यांत दर महिन्याला एक पुस्तक वाचून त्यावर परीक्षण लिहितात. दर महिन्याला उत्कृष्ट परीक्षण लिहिणाऱ्या, तसेच वर्षभर उत्कृष्ट परीक्षणे लिहिणाऱ्या आचार्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येते.
या प्रकल्पाच्या पहिल्या पर्वात गेल्या शैक्षणिक वर्षात आचार्यांनी आपल्या आवडीची पुस्तके वाचली होती.यंदा प्रत्येकाने आपल्या आवडीचे लेखक निवडून वर्षभर त्याच लेखकाची दहा पुस्तके वाचली आहेत.दर महिन्याला वाचलेल्या पुस्तकावर परीक्षण लिहिण्याव्यतिरिक्त लेखकाचे चरित्र,त्याची ग्रंथसंपदा,त्याला मिळालेले पुरस्कार व त्या लेखकाची लेखनशैली याविषयी समीक्षात्मक लेख आणि दृक्श्राव्य सादरीकरणही प्रत्येक आचार्याने तयार केले आहे उत्कृष्ट पुस्तक परीक्षणे,समीक्षात्मक लेख आणि दृक्श्राव्य सादरीकरणांना पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
आचार्यांच्या घरी स्वत:चे छोटेखानी ग्रंथालय तयार व्हावे या उद्देशाने या प्रकल्पाला जोडूनच आचार्य मासिक दोनशे रुपये काढून तीन हजार दोनशे रुपयांची ‘पुस्तक भिशी’ ही अभिनव योजना चालवतात व दर महिन्याला भाग्यवान ठरणारे आचार्य या रकमेतून आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करतात.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar