दिनांक : २५.०४.२०२३
*सनातन संस्थेने गोव्यात ठिकठिकाणी मंदिर स्वच्छता उपक्रम /
पणजी, २५ एप्रिल – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण देशात ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या अंतर्गत हिंदू समाजात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी आणि रामराज्यासम आदर्श राष्ट्राच्या उभारणीविषयी जागृती करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. मंदिरांचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेऊन सनातन संस्थेच्या वतीने जन्मोत्सवाचे औचित्य साधून दवर्ली, मडगाव येथील श्री सिद्ध दत्त मंदिर; वाडे, वास्को येथील श्री राष्ट्रोळी ब्राम्हणेश्वर देवस्थान; भोवतेर, वास्को येथील श्री भोवतेश्वर ब्राम्हणेश्वर देवस्थान; मेस्तावाडा, वास्को येथील श्री राम मंदिर; नारायणनगर, होंडा येथील श्री गणेश मंदिर; भामई, पाळी येथील श्री राम मंदिर आणि वडदेव नगर, होंडा येथील श्री व्याघ्रेश्वर वडदेव मंदिर येथे मंदिराच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. स्थानिक भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
आपला विश्वासू,
*श्री. तुळशीदास गांजेकर,*
(संपर्क क्रमांक : ९३७०९ ५८१३२)