श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक वर्गासाठी चालवण्यात येणारे ‘वाचन साधना’ व ‘पुस्तक भिशी’ या योजना अभिनव स्वरुपाच्या असून, गोव्यातच नव्हे,तर संपूर्ण देशात सर्व शाळांमधून राबवल्या जाव्यात

.

श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक वर्गासाठी चालवण्यात येणारे ‘वाचन साधना’ व ‘पुस्तक भिशी’ या योजना अभिनव स्वरुपाच्या असून, गोव्यातच नव्हे,तर संपूर्ण देशात सर्व शाळांमधून राबवल्या जाव्यात ,इतक्या महत्वपूर्ण आहेत, असे प्रतिपादन ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो यानी ‘विद्या भारती,गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ‘होराभूषण कै.वसुधा रघुनाथ वाटवे स्मृती वाचन साधना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या पर्वाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी या नात्याने बोलताना केले.
यावेळी सुप्रसिद्ध मराठी कवयित्री डॉ.अनुजा जोशी,प्रकल्पाचे प्रायोजक अतुल‌ वाटवे, ‘विद्या भारती, गोवा’ चे अध्यक्ष डॉ.सीताराम कोरगांवकर,संरक्षक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, विद्यालयाचे व्यवस्थापक पुरुषोत्तम कामत व प्राचार्य गजानन मांद्रेकर हे उपस्थित होते.
सन्माननीय अतिथी म्हणून बोलताना डॉ.अनुजा जोशी यानी चांगला लेखक होण्यासाठी आवश्यक त्या सर्व क्षमता ‘वाचन साधना’ या प्रकल्पात आहेत, त्यामुळे भविष्यात शिस्तबद्ध वाचन करणाऱ्या या विद्यालयाच्या शिक्षकांमधून नवीन लेखक निर्माण होतील,असे सांगून ‘वाचन साधना’ व ‘पुस्तक भिशी ‘ या नाविन्यपूर्ण योजना राबविल्याबद्दल विद्यालयाचे अभिनंदन केले.
डॉ.सीताराम कोरगांवकर व प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांचीही या योजनांबद्दल विद्यालयाचे कौतुक करणारी भाषणे झाली. अतुल वाटवे यानी आपल्या मातोश्रीच्या नावाने ‘वाचन साधना’ प्रकल्प सुरू केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ.वृंदा केळकर यानी परीक्षक या नात्याने या प्रकआपले निरीक्षणे नोंदविली.
‘वाचन साधना’ प्रकल्पातील उत्कृष्ट पुस्तक परीक्षण, लेखकांवरील समीक्षात्मक लेख व दृकश्राव्य सादरीकरण स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्पर्धकांपैकी प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
‘होराभूषण कै.वसुधा रघुनाथ वाटवे स्मृती वाचन साधना’ प्रकल्पाच्या तिसऱ्या पर्वाचा दामोदर मावजो यांच्या हस्ते शिक्षकांना परीक्षण वह्या प्रदान करून शुभारंभ करण्यात आला.
प्राचार्य सुभाष वेलिंगकर यांच्या हस्ते दामोदर मावजो यांचा शाल,श्रीफळ व समई देऊन सत्कार करण्यात आला.अतुल वाटवे यांच्या हस्ते परीक्षकांना भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सोहळ्यास प्रारंभ झाला. नारायण गांवस व प्रणय नाईक यानी ईशस्तवन सादर केले.प्राचार्य गजानन मांद्रेकर यानी प्रास्ताविकपर भाषणात ‘वाचन साधना’ व ‘पुस्तक भिशी’ संदर्भात सविस्तर माहिती दिली.
ज्येष्ठ आचार्य तथा प्रकल्प प्रमुख शिल्पा पै पाणंदीकर यानी संपूर्ण सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. नारायण गांवस यानी ऋणनिर्देश केला. विमल नाईक यानी गायिलेल्या शांतीमंत्राने सोहळ्याची सांगता झाली.
सोहळ्यास स्थानिक नगरसेविका डॉ.नूतन बिचोलकर,अनेक निवृत्त शाळाप्रमुख व विविध विद्यालयांचे शिक्षक उपस्थित होते.
(छायाचित्र:- म्हापसा येथील ‘विद्या भारती, गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या ‘वाचन साधना’ प्रकल्पाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलताना दामोदर मावजो व डॉ.अनुजा जोशी.)

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar