निवृत्तीनंतर जीवनाचे योग्य नियोजन केल्यास आयुष्य सुंदर होते – नारायण सोपटे केरकर

.

निवृत्तीनंतर जीवनाचे योग्य नियोजन केल्यास आयुष्य सुंदर होते
– नारायण सोपटे केरकर

निवृत्तीनंतरचे जीवन फार वेगळे असते त्यामुळे त्याचे योग्य पद्धतीने नियोजन केले तर उर्वरित आयुष्य सुंदर होते. त्यामुळे सकारात्मक आचार विचारातून निवृत्ती नंतरच्या जीवनात चैतन्य निर्माण करून आपला अनुभव समाजाच्या उन्नतीसाठी वापरावा असे प्रतिपादन केरी तेरेखोल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, निवृत्त पोलीस गुन्हा अन्वेषण अधिकारी व राष्ट्रपती पदक विजेते नारायण सोपटे केरकर यांनी केरी येथे केले.

केरी पेडणे येथील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या निवृत्त शिक्षिका निषिता आकरकर निवृत्त झाल्यानिमित्त केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण व शिक्षण संस्था, न्यू इंग्लिश हायस्कुल आणि पालक शिक्षक संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे या नात्याने ते यावेळी व्यासपीठावरून बोलत होते.

या प्रसंगी केरकर यांच्या सोबत शाळेचे व्यवस्थापक तातोबा तळकर, सचिब विनायक गाड, खजिनदार विनोद नाईक, सत्कार मूर्ती निषिता आकरकर, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा जयंती नार्वेकर, संघाचे सदस्य गजेंद्र कासकर, सुप्रिया केरकर आणि मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

व्यस्थापक तातोबा ताळकर आपल्या भाषणात म्हणाले, आकरकर या वैचारिक दृष्ट्या चिरतरुण , उत्साही आहेत. अशा सकारात्मक विचारांच्या शिक्षिका मिळणे हे शाळेचे भाग्य आहे.
आपल्या सेवा काळात मुलांची भवीतव्ये घडवण्यासाठी फार मोठे योगदान दिले.

चेअरमन नारायण सोपटे केरकर यांच्या हस्ते निषिता आकरकर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि भेट वस्तू दडून सन्मान करण्यात आला.

यावेळी संमला उत्तर देताना आकरकर म्हणाल्या की,
व्यवस्थापन, पालक शिक्षक संस्था, शिक्षक आणि विद्यार्थ्यानी विद्यादान काळात भरीव पाठिंबा दिल्यामुळेच आपण शिक्षिका म्हणून घडू शकले. त्यामुळे केरी गाव आणि न्यू इंग्लिश हायस्कुलची आपण सदैव ऋणी असणार असे सांगितले.

सत्यवान हर्जी, महिमा चारी, जयंती नार्वेकर आणि मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सर्वेश कोरगावकर यांनी केले. शालेय विद्यार्थ्यांनी प्रारंभी स्वागत गीत सादर केले. संगीत शिक्षक यशवंत शेट्ये यांनी वैयक्तिक गाणे सादर केले. तर वैशाली न्हांजी यांनी शेवटी आभार मानले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar