कौटुंबिक ऐकताच सामाजिक शांततेचा स्रोत – प्रसाद देशमुख वेद व ध्यान साधना गोवा म्हापसा विभाग मार्फत मातृपितृ पूजन सोहळा

.

कौटुंबिक ऐकताच सामाजिक शांततेचा स्रोत – प्रसाद देशमुख
वेद व ध्यान साधना गोवा म्हापसा विभाग मार्फत मातृपितृ पूजन सोहळा

वेद व ध्यान साधना गोवा म्हापसा विभाग मार्फत वैदिक उन्हाळी शिबिराची सांगता मातृपितृ पूजन सोहळ्यानि ३० एप्रिल रोजी श्री गणपती मंदिर गणेशपुरी म्हापसा येथे झाली.

वेद मंत्र घोषांनी विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुरवात केली व वेद व ध्यान साधना गोवा म्हापसा विभागाच्या संयोजिका सौ रुपाली गौंडाळकर ह्यांनी वेद व ध्यान साधना म्हापसा विभागाच्या कार्य विषयी माहिती दिली तसेच वेद मंत्राचा घोष घरामध्ये केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते व हा आपल्या भारतीय संस्कृतीचा मूळ गाभा आहे असे त्या ह्या प्रसंगी म्हणाल्या व सर्व विध्यार्थी व पालक ह्याचे स्वागत केले.

वेद व ध्यान साधना गोवा चे वेद गुरु श्री प्रसाद देशमुख ह्यांनी पालकांना पालक व पाल्य ह्यांच्या मधील नात्याच्या महत्वावर प्रकाशझोत टाकला

श्री देशमुख म्हणाले , आपली भारतीय संस्कृती हे संयुक्त कुटुंब व्यवस्थेचे आदर्श उदाहरण आहे व त्यामुळे मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार पिढ्यानपिढ्या होत आहेत. पालकांनी आपल्या पाल्याला योग्य वातावरण निर्माण करून देणे गरजेचं आहे ज्यामुळे मुलांचा योग्य विकास होऊन एक परिपूर्ण व्यक्तिमत्व त्यांचा बनते जे कुटुंब व समाजासाठी हितकारक आहे .पालकांनी मुलं सोबत वेळ द्यायला हवा जेणेकरून कुटुंब मध्ये सलोख्याचे वातावरण कायम राहते. मातृपितृ पूजन हा पाल्याचे आपल्या पालकांविषयी आदर व प्रेम भावना व्यक्त करणारा तसेच विनम्रता वाढवणारा असा एक संस्कार आहे. मातृ पितृ पूजन सोहळ्याच्या माध्यमातून मुलांचा आपल्या पालकांशी घट्ट नातं बनते जे कौटुंबिक जवळीक निर्माण करायला मदत करते . मुलांनी आपल्या पालकांना आदर देऊन त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालावे असे श्री देशमुख ह्यांनी सांगितले.

ह्या प्रसंगी मुलांनी आपल्या आई वडिलांची पाद्य पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली व एक भावनिक प्रसंग पालक व विध्यार्थ्यानी अनुभवाला, ज्यातून आपले पालक हे मुलांमध्ये ईश्वरासमान असण्याची जाणीव निर्माण झाली. ह्या प्रसंगी म्हापसा परिसरातील अनेक पालक, पाल्य तसेच वेद व ध्यान साधना म्हापसा विभागाचे सेवक रुपाली गौंडाळकर, सीमा बांदेकर, हेमा मिसाळ, प्रगती इंगळे, दिलीप महाले, पत्रकार भारत बेतकीकर हे उपस्थित होते व ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत शेट्ये ह्यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar