करमळी, तिसवाडी येथील श्रीमती सूनंदाबाई बांदोडकर हायस्कूल च्या विद्यार्थीच्या सोयीसाठी दोन सुसज्ज वर्ग खोल्या

.
  म्हापसा वाताहार
करमळी, तिसवाडी येथील श्रीमती सूनंदाबाई बांदोडकर हायस्कूल च्या विद्यार्थीच्या सोयीसाठी दोन सुसज्ज वर्ग खोल्या बांधून त्या हायस्कूलच्या व्यवस्थापन समिती कडे सुपूर्द केल्या या दोन वर्ग खोल्यांचं बांधकाम. खर्च फन स्कूल इंडिया लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आला. या वर्गखोल्याचं लोकापर्ण फन स्कूल कंपनी चे चिफ executive आॅफिसर आर. जेसवंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायत चे अध्यक्ष सिद्धेश नाईक, जिल्हा पंचायत सदस्य शंकर चोडणकर, खौली पंचायतीचे सरपंच लुसियानो बाप्तिसा परेरा, करमळी पंचायत चे सरपंच कृष्टा सालेलकर, संस्थेचे अध्यक्ष ॲड. चंद्रकांत चोडणकर, उपाध्यक्ष प्रा. सुभाष कौठणकर, सचिव डॉ. सचिन गोवेकर, व्यवस्थापक किशोर गावकर, हायस्कूल चे कार्यकारी मुख्याध्यापक सुबोध महाले, फन स्कूल कंपनी चे व्यवस्थापक ललातेंहू खुंटिया तसेच पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना आर. जेसवंत म्हणाले की आपली कंपनी मुलांसाठी खेळणी बनवत असते, या मुलावरच आपला व्यवसाय अवलंबून आहे, अशा मुलांच्या शाळेसाठी आपल्या कंपनीला दोन वर्ग खोल्या बांधून देण्याचे योगदान मिळाले त्याचा आनंद वाटतो. यापुढे ही अशा प्रकारच्या सामाजिक उपक्रमात आपल्या कंपनीचा सहभाग असेल.
सन्माननिय पाहूणे या नात्याने बोलताना सिद्ध ैश नाईक म्हणाले की लवकरच या हायस्कूलला जिल्हा पंचायत निधीतून स्माट वर्ग उपलब्ध करून देण्यात येईल, सरपंच लुसियानो परेरा तसेच कृष्टा सालेलकर यांनी हायस्कूल साठी नुतन इमारत उभारण्यात दोन्ही पंचायती कडून सवौतोपरी मदत करण्यास मदत करण्यात येईल असे जाहीर केले. यावेळी शंकर चोडणकर, याचेही भाषण झाले. सुबोध महाले यांनी स्वागत केले. तर रोषन आगरवाडेकर व अंजली फडते यांनी सुत्रसंचालन केले तर ब्रिदन वळव ईकर हीने आभार मानले. फोटो दीप प्रज्वलन करताना आर. जेसवंत, बाजूला सिद्ध ैश नाईक, सुबोध महाले

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar