माधवी मकरंद भातखंडे यांचा सत्कार.

.

सौ माधवी मकरंद भातखंडे यांचा सत्कार.

शहिद कर्नल सिंग बनिपाल सरकारी प्राथमिक शाळा, पत्रादेवी येथील निवृत्त शिक्षिका व मुख्याध्यापिका सौ माधवी मकरंद भातखंडे यांचा पालक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्यास व्यासपीठावर तोरसे गावच्या सरपंच सौ प्रार्थना मोटे,मा. जि. पं. सदस्य श्री रमेश सावळ,पंच सौ. छाया शेट्ये, पंच सौ पुजा साटेलकर. पा.शि. सं. अध्यक्षा सौ. संतोषी तारी. शाळा व्य. समीती अध्यक्षा सौ. अर्चना अरुण सावळ हजर होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय विद्यालय तोरसे येथील सहायक शिक्षक श्री सुभाष शेटगांवकर हजर होते.
पा. शी. सं.वतीने महीला मंडळींनी सौ. माधवी मकरंद भातखंडे यांची ओटी भरण्यात आली व शिक्षक श्री सुभाष शेटगांवकर यांच्या हस्ते सरस्वतीची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.
सौ . माधवी मकरंद भातखंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सरपंच सौ प्रार्थना मोटे यांनी आपल्या भाषणात शाळेला सर्वोतोपरी मदत करीत व श्री रमेश सावळ यांनी आपले सहकार्य शाळेला नेहमीच असेल असे नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात श्री सुभाष शेटगांवकर यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांचे, शाळेत चालणाऱ्या उपक्रमांचे व शाळा चालवण्यासाठी मदत करणाऱ्या पालक शिक्षक संघाचे कौतुक केले निवृत्त शिक्षिका सौ.माधवी भातखंडे दीर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के. जी टिचर सौ प्रणाली प्रवीण सावळ व पा .शि. संघाने मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे स्वागत. प्रास्ताविक व परीचय शिक्षीका रेष्मा आसोलकर व आभार प्रदर्शन शिक्षीका सौ. अनिता तांबोसकर यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar