- श्री.शांता विद्यालयामध्ये श्री.देवानंद पेडणेकर यांचा सत्कार सोहळा संपन्न
विद्याभारती संचालित सडये शिवोली येथील श्री.शांता विद्यालयामध्ये दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी श्री. देवानंद पेडणेकर हे उच्च विभागीय कारकून या पदावरून सेवा निवृत्त झाले यावेळी त्यांना समर्पित सेवानिवृत्ती निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या समारंभाला माजी मुख्याध्यापक श्री कमलाकांत वायंगणकर ,विद्याभारती गोवा विभागाचे सचिव श्री माधव केळकर ,विद्याभारती गोवा विभागाचे सदस्य श्री. शिवशंकर मयेकर ,माजी मुख्याध्यापक श्री. शशिकांत नाईक, शाळेचे व्यवस्थापक श्री शिवाजी पाटील ,पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री.परमेश्वर पुजारी , श्री. मंगेश कासकर ,श्री. स्नेहल नाईक गोल्तेकर हे मान्यवर उपस्थित होते तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.प्रजिता सांगाळे ,शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुख्याध्यापिका सौ प्रजिता सांगाळे यांनी मान्यवरांच्या कार्यकृत्याचा परिचय करून दिला तसेच शब्द सुमनांनी त्यांचे स्वागत केले. शिक्षक श्री उमेश महालकर यांनी श्री देवानंद पेडणेकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीचा अहवाल सादर केला तसेच शिक्षक श्री विश्वास सांगाळे यांनी त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे दर्शन घडविले. श्री.देवानंद पेडणेकर यांनी शाळेसाठी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शाल ,श्रीफळ व मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या सौभाग्यवती दिप्ती पेडणेकर यांची खणा नारळाने ओटी भरण्यात आली. श्री.देवानंद पेडणेकर यांनी शाळेच्या भरभराटीसाठी केलेल्या कार्यानुभवाचे वर्णन माजी मुख्याध्यापक श्री.कमलाकांत वायंगणकर यांनी केले.तसेच श्री.माधव केळकर व श्री.शिवशंकर मयेकर यांनी श्री.देवानंद पेडणेकर यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री संगम चोडणकर यांनी केले तर आभार प्रकटन शिक्षिका सौ विषया आमणेकर गावस यांनी केले. यावेळी उपस्थितितांसाठी अल्पोहाराची ही व्यवस्था करण्यात आली होती .या कार्यक्रमाची सांगता शांतीपाठाने करण्यात आली.