अॅक्सिस बँक आणि इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी को-लेंडीग मॉडेल अंतर्गत केली धोरणात्मक भागीदारीची घोषणा

.

अॅक्सिस बँक आणि इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी को-लेंडीग मॉडेल अंतर्गत केली

धोरणात्मक भागीदारीची घोषणा

मुंबई, ३ मे २०२३: भारतातील तिसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक असलेली अॅक्सिस बँक आणि
गुडगाव स्थित हाऊसिंग फायनान्स कंपनी इंडिया शेल्टर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (इंडियाशेल्टर) यांनी
आज को-लेंडीग मॉडेल अंतर्गत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीसह दोन्ही कर्ज
पुरवठादार निमशहरी प्रदेशातील मध्यम आणि कमी उत्पन्न गटातील कर्जदारांना सुरक्षित एमएसएमई कर्ज
देतील.
ही भागीदारी कर्जदाराच्या क्रेडिट प्रोफाइलचे मूल्यांकन करण्यासाठी आणि अखंड बँकिंग अनुभवाची खात्री
करून, त्यांना इष्टतम व्याजदरावर कर्ज देण्यासाठी अॅक्सिस बँकेच्या सखोल आर्थिक कौशल्याचा आणि
इंडियाशेल्टरच्या मजबूत कर्ज प्रक्रिया तंत्रज्ञानाचा लाभ घेईल. ही भागीदारी अॅक्सिस बँक आणि
इंडियाशेल्टरला कर्ज प्रक्रियेतील नवख्या असलेल्या आणि ज्यांना मोठ्या संस्थांद्वारे कर्ज सेवा कमी उपलब्ध
होते अशा संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम करेल.
या सहयोगाविषयी बोलताना अॅक्सिस बँक भारत बँकिंगचे ग्रुप एक्झिक्युटिव्ह आणि प्रमुख श्री. मुनीष
शारदा म्हणाले, “इंडियाशेल्टर सोबतची आमची भागीदारी ही दुर्गम भागात पोहोच वाढवणे आणि अखंड
विनाअडथळा डिजिटल पद्धतीने आर्थिक सेवा प्रदान करणे या बँकेच्या भारत बँकिंग ध्येयाशी सुसंगत आहे.
या भागीदारीद्वारे आम्ही मॉर्टगेज विभागातील आमचे स्थान मजबूत करू आणि बँकेला तिच्या प्राधान्य
क्षेत्रातील कर्ज पोर्टफोलिओ वाढवण्यास मदत करू. आमच्या डिजिटल को-लेंडिंग प्लॅटफॉर्मने भागीदारी जलद
गतीने वाढवण्यास अनुमती दिल्याने आणि उत्कृष्ट ग्राहक अनुभव दिल्याने आम्ही या संधीबद्दल उत्सुक
आहोत.”
अॅक्सिस बँकेसोबतच्या भागीदारीबद्दल भाष्य करताना इंडिया शेल्टर हाऊसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय
संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रुपिंदर सिंग म्हणाले, “इंडियाशेल्टर निमशहरी कुटुंबांतील
पहिल्या पिढीला क्रेडिट मिळवण्यात मदत करण्यात आघाडीवर आहे. मोठ्या प्रमाणात बँकिंग सुविधा
नसलेल्या अदस्तांकित उत्पन्न असलेल्या ग्राहकांच्या निधीच्या गरजा सोडवण्यासाठी आम्ही काम करत
आहोत. परवडणाऱ्या घरांसाठी अनौपचारिक उत्पन्न विभागातील कर्जे अंडरराइटिंगमध्ये असलेल्या १२
वर्षांचा विकसित सखोल कौशल्य अनुभव आणि त्याच्या सुस्थापित फिजिटल मॉडेलद्वारे व्यापक पोहोच
आमच्याकडे आहे. यासह अॅक्सिस बँकेसोबतची भागीदारी संपूर्ण भौगोलिक क्षेत्रांमध्ये खोलवर जाऊन
आर्थिक सर्वसमावेशकता आणण्याच्या आणि भरीव सामाजिक प्रभाव असलेला शाश्वत विकास निर्माण
करण्याच्या आमच्या ध्येयाकडे झेप घेण्याची आमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.”

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar