कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने सुरु केले हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक

.

 

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने सुरु केले हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक
भारतात कर्करोगाच्या रुग्णांना पुरवल्या जाणाऱ्या वैयक्तिक देखभाल सेवांमध्ये नवपरिवर्तन घडवून आणण्यासाठी उचलले पुढचे पाऊल
~ प्रिसिजन ऑन्कोलॉजी अँड पर्सनलाइज्ड मेडिसिन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले.
~ ज्यांना कर्करोग होण्याचा धोका आहे अशा कुटुंबियांच्या प्रोऍक्टिव जेनेटिक स्क्रीनिंग्समुळे कर्करोग लवकरात लवकर लक्षात येईल आणि त्याला प्रतिबंध घातला जाऊ शकेल.
~ रुग्णांना वैयक्तिक देखभाल पुरवण्यासाठी या क्लिनिकमध्ये सर्वसमावेशक जेनेटिक कौन्सेलिंग व टेस्टिंग सेवा उपलब्ध करवून दिल्या जातील.

मुंबई, ३० एप्रिल २०२३: कर्करोगावरील उपचार आणि देखभालीमध्ये अद्ययावत वैद्यकीय प्रगती व अत्याधुनिक तंत्रज्ञान सादर करण्यात नेहमी आघाडीवर असलेल्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक सुरु केल्याची घोषणा केली आहे. हॉस्पिटलने आयोजित केलेल्या प्रिसिजन ऑन्कोलॉजी अँड पर्सनलाइज्ड मेडिसिन या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत या क्लिनिकचे उदघाटन करण्यात आले. संपूर्ण भारतभरातील रुग्णांना कर्करोगामध्ये वैयक्तिक देखभाल पुरवण्याची हॉस्पिटलची वचनबद्धता या क्रांतिकारी क्लिनिकमुळे अधिक मजबूत झाली आहे, प्रत्येक रुग्णाला अत्याधुनिक प्रिसिजन ऑन्कोलॉजी देखभाल उपलब्ध व्हावी यासाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल करत असलेल्या प्रयत्नांमध्ये हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. प्रत्येक रुग्णाच्या वैयक्तिक गरजा प्रभावीपणे पूर्ण करणाऱ्या नाविन्यपूर्ण थेरपी उपलब्ध करवून देण्याच्या प्रिसिजन मेडिसिनच्या शक्तीचा उपयोग करून कर्करोगावरील वैयक्तिक आणि विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून करण्यात येणारे उपचार उपलब्ध करवून देण्याच्या प्रयत्नांबरोबरीनेच कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने हे पुढचे पाऊल उचलले आहे.

भारतात दरवर्षी कर्करोगाच्या जवळपास १.४ मिलियन नवीन केसेसचे निदान केले जाते. कर्करोगावरील उपचारांच्या प्रभावामध्ये सुधारणा घडवून आणून या आजाराचे ओझे लक्षणीय प्रमाणात कमी करण्याची क्षमता प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये आहे. आनुवंशिक चाचणी हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीचा एक महत्त्वाचा घटक आहे, याच्या साहाय्याने व्यक्ती आणि त्याच्या कुटुंबातील जीन म्युटेशन्स ओळखता येतात, हा आजार होण्याची शक्यता आहे अथवा नाही हे कर्करोगाची लक्षणे दिसून येण्याच्याही आधी समजून येऊ शकते. कर्करोगासाठी उपचार धोरणे विकसित करण्यात हे खूप उपयुक्त आहे.

या परिषदेमध्ये जगभरातील आघाडीचे ऑन्कोलॉजिस्ट्स, संशोधक आणि वैद्यकीय व्यावसायिक एकत्र आले होते, त्यांनी केलेल्या पॅनल चर्चांमध्ये कॅन्सरवरील देखभालीतील नवी प्रगती आणि अभिनव उपचार धोरणे आणि प्रिसिजन ऑन्कोलॉजीचे भवितव्य याविषयी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.

कॅन्सरवरील उपचारांमध्ये प्रिसिजन ऑन्कोलॉजी हा एक अभिनव दृष्टिकोन आहे. यामध्ये ट्युमर मॉलिक्युलर लेवलला असताना प्रोफाइल केले जातात आणि बदल ओळखू येतात, यामुळे व्यक्तीच्या कॅन्सरचा प्रकार कोणता आहे त्यानुसार वैयक्तिक उपचार विशेष डिझाईन केले जाऊ शकतात. प्रत्येक रुग्णाला योग्य वेळी, योग्य डोस देऊन, कॅन्सरवरील योग्य उपचार देणे प्रिसिजन मेडिसिनमुळे शक्य होते. कॅन्सरवरील वैयक्तिक उपचारांसह प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सखोल जेनेटिक माहितीचा वापर केला जातो आणि प्रत्येक रुग्णाच्या जेनेटिक जडणघडणीनुसार आणि कॅन्सरच्या वैशिष्ट्यांनुसार उपचार योजना तयार केल्या जातात. हा दृष्टिकोन अवलंबिण्यामध्ये आणि रुग्णाच्या कॅन्सर प्रवासातील प्रत्येक घटकाचा समावेश असेल अशी सर्वसमावेशक देखभाल पुरवण्यात कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आघाडीवर आहे. हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक हा या प्रक्रियेचा अविभाज्य भाग आहे, याठिकाणी व्यापक जेनेटिक कौन्सेलिंग आणि टेस्टिंग सेवा पुरवल्या जातात, ज्यामुळे विविध प्रकारच्या कर्करोगांशी संबंधित जेनेटिक धोके ओळखता येतात, त्यावर उपचार करता येतात.

या परिषदेमध्ये एका सत्कार समारंभाचे देखील आयोजन करण्यात आले होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या अध्यक्ष श्रीमती टीना अनिल अंबानी यांनी भारत आणि जगभरातील ऑन्कोलॉजी क्षेत्रातील नामवंत डॉक्टर व यशवंतांचा सत्कार केला. श्रीमती टीना अनिल अंबानी यावेळी म्हणाल्या, “तंत्रज्ञान व प्रतिभा या दोन्हींमध्ये नेहमीच आघाडीवर असणाऱ्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलने कॅन्सरमधील देखभालीला व्यापक प्राथमिकता दिली आहे. प्रिसिजन ऑन्कोलॉजी आणि वैयक्तिक वैद्यकीय उपचार हे कॅन्सरमधील देखभालीतील नवे दृष्टिकोन आहेत. भरपूर माहिती, देवाणघेवाण, सहयोग व समन्वयासाठी प्रभावी मंच, संवादाची संधी आणि उत्कृष्टतेचा सत्कार करण्यासाठी फोरम उपलब्ध करवून देणाऱ्या या परिषदेचे आयोजन करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आनुवंशिक कॅन्सर क्लिनिक सुरू करून आम्ही अचूक ऑन्कोलॉजी आणि वैयक्तिक औषधांवर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्यामुळे कर्करोगाच्या कौटुंबिक जोखमीचा अंदाज लावण्यात आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात मदत होईल. ‘कन्टेन, कॉम्बॅट अँड काँकर कॅन्सर’ या आमच्या मिशनमध्ये आम्ही आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.”

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ संतोष शेट्टी यांनी सांगितले, “कॅन्सरवरील देखभालीमध्ये सर्वोत्तम जागतिक प्रथांचे पालन करत कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल आघाडीवर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि संशोधनामध्ये गुंतवणूक करत राहण्याच्या आमच्या बांधिलकीमध्ये कॅन्सरमध्ये वैयक्तिक देखभालीत प्रगती घडवून आणण्यासाठीची आमची समर्पित वृत्ती स्पष्टपणे दिसून येते. प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये उत्कृष्टता साध्य करण्यासाठीच्या प्रयत्नांमधून हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिक सुरु करण्यात आले आहे. कुशल तज्ञ, अत्याधुनिक सुविधा आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांच्यासह नवे क्लिनिक सुरु करणे हे एका संस्थेची कॅन्सरमधील देखभालीत प्रगती घडवून आणण्यासाठीची सर्वात मोठी वचनबद्धता दर्शवते. यामुळे कॅन्सर देखभालीमुळे घडून येणाऱ्या परिणामांमध्ये लक्षणीय परिवर्तन घडून येण्याची शक्यता आहे.”

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल भारतामध्ये प्रिसिजन ऑन्कोलॉजीमध्ये आघाडीवर आहे, कॅन्सर रुग्णांना जागतिक दर्जाची देखभाल पुरवली जावी यासाठी अभिनव तंत्रज्ञान व उपचार पर्याय हे हॉस्पिटल सातत्याने उपलब्ध करवून देत असते. महाराष्ट्रात अकोला, गोंदिया आणि सोलापूर याठिकाणी कॅन्सर केयर सेंटर्स सक्रिय असून या इन्स्टिट्यूटमध्ये ऑन्कोलॉजी टीममध्ये ४५ पेक्षा जास्त कन्सल्टन्ट आणि २२५ सदस्यांची कुशल टीम आहे. आजवर या टीमने १७५००० पेक्षा जास्त केमोथेरपी, ६ लाख रेडिएशन सायकल्स आणि ६३००० शस्त्रक्रिया केल्या आहेत. भारतातील कॅन्सर रुग्णांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील नवनवीन शोधांचे लाभ उपलब्ध करवून देण्यात एज रेडियोसर्जरी सिस्टिम सुरु करून या हॉस्पिटलने एक मोठे योगदान दिले आहे. ट्रू बीम इक्विपमेंटचे इन्स्टॉलेशन हा प्रिसिजन ऑन्कोलॉजीविषयी आणखी एक अत्याधुनिक दृष्टिकोन आहे. याठिकाणी अनेक पूर्णकालीन सबस्पेशलिस्ट्स आहेत जे अनेक विविध प्रकारचे कॅन्सर हाताळण्यात तज्ञ आहेत. सार्वजनिक स्तरावर प्रकाशित करण्यात येणारी माहिती, स्क्रीनिंग, निदान, उपचार, वेदनांवरील उपचार आणि पॅलिएटिव्ह केयर यांच्या माध्यमातून ते कॅन्सर देखभालीत उपयुक्त ठरतील अशा अनेक सेवा पुरवतात.

हेरेडिटरी कॅन्सर क्लिनिकने या वचनबद्धतेला अधिक मजबूत करत, उच्चतम दर्जाची देखभाल पुरवण्याची आणि कॅन्सरचा सामना करण्यासाठी रुग्णांना जी साधने हवी असतात ती पुरवून त्यांना सक्षम करण्याची कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलची बांधिलकी प्रस्थापित केली आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar