गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात

.

गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’गोवा संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्या दोन वर्षांपासून आचार्य व आचार्येतर वर्गासाठी चालविण्यात येणाऱ्या ‘होराभूषण कै.वसुधा रघुनाथ वाटवे स्मृती वाचन साधना’ प्रकल्पाच्या दुसऱ्या पर्वातील पुस्तक परीक्षण,लेखक परिचय व दृकश्राव्य सादरीकरण या स्पर्धांमध्ये अनुक्रमे संध्या आरोलकर, नेहा मडकईकर व अभय सावंत यानी प्रथम क्रमांक पटकावले.
पुस्तक परीक्षण स्पर्धेत डॉ.अक्षया भगत व आश्विनी बांदेकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले,तर नारायण गांवस, अभय सावंत व प्रणय नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त झाली.
लेखक परिचय स्पर्धेत श्रेया नाईक व शिल्पा पै पाणंदीकर यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले,तर दृकश्राव्य सादरीकरण स्पर्धेत शिल्पा पै पाणंदीकर व नेहा मडकईकर या अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मानकरी ठरल्या.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोंकणी साहित्यिक दामोदर मावजो व सुप्रसिद्ध कवयित्री डॉ.अनुजा जोशी, प्रकल्पाचे प्रायोजक अतुल वाटवे,’विद्या भारती, गोवा’ चे अध्यक्ष डॉ.सीताराम कोरगांवकर, संरक्षक प्राचार्य सुभाष वेलिंगकर, विद्यालयाचे व्यवस्थापक पुरुषोत्तम कामत व प्राचार्य गजानन मांद्रेकर यांच्या उपस्थितीत अलीकडेच पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.
पुस्तक परीक्षण स्पर्धेसाठी प्रा.डॉ.वृंदा केळकर,साहित्यिक गजानन देसाई व कथाकार विठ्ठल गांवस यानी,तर लेखक परिचय स्पर्धेसाठी अनंत पार्सेकर, पत्रकार किशोर शेटमांद्रेकर व लेखिका पौर्णिमा केरकर यानी परीक्षक म्हणून काम पाहिले.दृकश्राव्य सादरीकरण स्पर्धेचे परीक्षण निवेदक परेश नाईक,मयूर ताम्हणकर व सुबोध नाईक यानी केले.
रोख स्वरूपात दिलेल्या पारितोषिकांच्या रकमेतून विजेते नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी आपल्या आवडीची पुस्तके खरेदी करणार आ

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar