एचडीएफसी बँके तर्फे त्यांच्या एजंट्स आणि भागीदारांसाठी डिजिटल वितरण मंच: एचडीएफसी बँक स्मार्ट साथी ची सुरुवात*

.

*एचडीएफसी बँके तर्फे त्यांच्या एजंट्स आणि भागीदारांसाठी डिजिटल वितरण मंच: एचडीएफसी बँक स्मार्ट साथी ची सुरुवात*

डीएफएसचे सचिव,विकेक जोशी यांच्या हस्ते एचडीएफसी बँक स्मार्ट साथी ची सुरुवात, आता बँकिंग उत्पादने आणि सेवा देशातील सर्वदूर भागात पोहोचणार

मे २०२३- एचडीएफसी बँक या भारतातील आघाडीच्या खाजगी क्षेत्रातील बँके ने आज डिजिटल डिस्ट्रिब्युशन प्लॅटफॉर्म (डीडीपी)- ‘ एचडीएफसी बँक स्मार्ट साथी’ या अत्याधुनिक अशा मजबूत आणि डिजिटल मंचावरील तंत्रज्ञान आर्किटेक्चर ने युक्त मंचाची सुरुवात केल्याची घोषणा केली असून हा मंच वापरकर्त्यांसाठी खूपच सुरक्षित आणि सोपा अनुभव प्राप्त करुन देणार आहे. या सुरुवातीमुळे आता एचडीएफसी बँकेच्या नाविन्यपूर्ण उत्पादने देऊन ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्याच्या मिशनला चालना मिळणार आहे. या मंचामुळे तंत्रज्ञानाच्या उपयांचा लाभ होऊन बँकेच्या बिझनेस करस्पाँडंट्स(बीसी) आणि बिझनेस फॅसिलीटेटर्स (बीएफ्स) शी जोडणे शक्य होणार आहे. या बिझनेस करस्पाँडंट्स आणि बिझनेस फॅसिलिटेटर्स च्या नेटवर्क मुळे बँकिंग उत्पादने आता अगदी कानाकोपर्‍यात नेता येतील आणि त्यामुळे वित्तीय सर्वमसमावेशकतेला चालना मिळेल. बँकेच्या निमशहरी आणि ग्रामीण भागाच्या सखोल ज्ञानाचा वापर करुन हा ग्राहकांशी सुसंगत असा मंच निर्माण करण्यात आला आहे.

‘एचडीएफसी बँक स्मार्ट साथी’ ची सुरुवात आज दिल्ली येथे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस चे सचिव श्री विवेक जोशी आणि एचडीएफसी बँकेच्या गव्हर्मेंट ॲन्ड इन्स्टिट्यूशनल बिझनेस, अल्टरनेट बँकिंग चॅनल्स ॲन्ड पार्टनरशिप्स, इन्क्लुझिव्ह बँकिंग ग्रुप ॲन्ड स्टार्ट अप च्या ग्रुप हेड श्रीमती स्मिता भगत यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियलद सर्व्हिसेस चे जॉईंट सेक्रेटरी श्री मुकेश बन्सल यांच्या एचडीएफसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री दिनेश लुथरा आणि श्री अजय शर्मा यांचा समावेश होता.

“अशा प्रकारच्या डिजिटल मंचांमुळे भारताला कॅशलेस अर्थव्यवस्था आणि खरोखरच डिजिटल सर्वसमावेशकता आणण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आमचे योगदान ठरेल. एचडीएफसी बँक स्मार्ट साथी मुळे बँकिंग उत्पादने आणि सेवा ‍विशेषकरुन कर्जपुरवठा हा ग्रामीण ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, यामुळे आपल्या देशाच्या विकासासही चालना मिळेल. पण आजही वागणूकीत काही बदल करणे विशेष करुन शेतकरी मंडयांमध्ये करत असलेले व्यवहार असे व्यवहार कॅशलेस झाल्यास भारतातले हे मोठे यश असेल. बिझनेस करस्पाँडंट्स हे वागणूकीतील बदल घडवून आणण्यास मदत करतील.” असे डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस चे सचिव श्री विवेक जोशी यांनी सांगितले.

“ पुढील १२ ते १८ महिन्यांच्या कालावधीत आम्ही २ लाख गावांपर्यंत शाखा आणि एजंट नेटवर्क्सच्या माध्यमातून पोहोचण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. या मंचा मुळे हे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ग्रामीण भारताची प्रगती झाल्यास म्हणजेच राहणार्‍या ७० टक्के लोकांची प्रगती होऊन भारताचे ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार होऊ शकेल.” असे एचडीएफसी बँकेच्या गव्हर्मेंट ॲन्ड इन्स्टिट्यूशनल बिझनेस, अल्टरनेट बँकिंग चॅनल्स ॲन्ड पार्टनरशिप्स, इन्क्लुझिव्ह बँकिंग ग्रुप ॲन्ड स्टार्ट अप च्या ग्रुप हेड श्रीमती स्मिता भगत यांनी सांगितले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar