काँग्रेस पक्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे आश्वास युथ काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण करणार, 130 पेक्षा अधिक जागांचा विश्वास ः आंद्राद

.

काँग्रेस पक्ष प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे आश्वास युथ काँग्रेसच्या माध्यमातून पूर्ण करणार, 130 पेक्षा अधिक जागांचा विश्वास ः आंद्राद

पणजी ः काँग्रेस पक्ष कर्नाटकमध्ये स्पष्ट बहुमत प्राप्त करणार आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कर्नाटक राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असून यासाठी दिवसरात्र काम केले जात आहे. याद्वारे ते पक्षाच्या योजना कर्नाटकमधील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गोवा युथ काँग्रेसचे अध्यक्ष जोएल आंद्राद यांनी रविवारी सांगितले.
देशभरातून युथ काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्ा संख्येने कर्नाटकमध्ये प्रचार करत असून नेतृत्वाला साहाय्य करत आहे. युथ काँग्रेस कार्यकर्त्यांमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही दुणावला आहे.
कर्नाटकमध्ये 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी केली जाणार आहे.
बंगळुरू कर्नाटकमधील प्रसारमाध्यामांशी बोलताना आंग्राद म्हणाले की, आम्ही पूर्ण बहुमतासह कर्नाटक विधानसभा निवडणूक जिंकणार आहोत. 224 पैकी 130 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा आम्हाला विश्वास असून मतदानाला काही दिवस असताना आम्ही आता 150 पेक्षा अधिक जागा मिळविण्याचा प्रयत्नाला लागलो आहोत.
पणजी महानगरपालिकेचे युवा नगरसेवक असलेले आंद्राद यांनी गोव्यातील युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली असून त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोव्यातील युथ काँग्रेसचे कार्यकर्ते कर्नाटकात काँग्रेस पक्षाचा प्रचार करत आहेत.
आंद्राद यांनी बंगळुरू येथून ट्विट करताना म्हटले की, बंगळुरूच्या रस्त्यांवर उतरून मी प्रचार मोहिमेत भाग घेतला आहे. दारोदारी जाणे होत आहे. लहान मोठ्या बैठका व इतर अनेक गोष्टी होत आहेत. युथ काँग्रेस अथक परिश्रम घेत असून याद्वारे काँग्रेसने प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले जात आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसची लाट आहे.
आंद्राद हे कर्नाटकच्या अनेक भागांत प्रचार करत असून यात उत्तर कन्नडा, बंगळुरू आदी भागांचा समावेश आहे. कर्नाटकमधील लोकांचा काँग्रेसप्रती असलेला उत्साह पाहून काँग्रेस कार्यकर्त्यांना स्फुरण चढले आहे. या निवडणुकीद्वारे काँग्रेस पक्ष 2024च्या लोकसभा निवडणूकीची सज्जता दाखवणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड व राजस्थान राज्यातील निवडणूकांमध्येदेखील काँग्रेस पक्ष दमदार कामगिरी करणार असा विश्वास आंद्राद यांनी व्यक्त केला आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar