फेस्टिव्हलमधील प्रत्येक क्षण आपल्या डिव्हायसेसवर कॅप्चर करून ठेवता येतो, भरपूर फोटो आणि व्हिडिओ घेऊन आयुष्यभर जपून ठेवता येतील अशा आठवणी निर्माण करता येतात.
क्रोमाची मजबूत रिटेल उपस्थिती हा आणखी एक लाभदायक घटक आहे, क्रोमा सनबर्न मर्चन्डाईज देशभरातील विविध शहरांमध्ये क्रोमा स्टोर्समध्ये उपलब्ध करवून देण्यात येईल. क्रोमासोबत भागीदारीमुळे सनबर्नला आपली पोहोच वाढवता येईल, त्यांचे चाहते भारतभरातील स्टोर्समध्ये तसेच croma.com मार्फत ऑनलाईन देखील सनबर्न उत्पादने व मर्चन्डाईजचा आनंद घेऊ शकतील. आजवर फक्त मेट्रो शहरांमधील चाहत्यांना सनबर्नचा आनंद घेता येत होता पण आता क्रोमाने हा अनुभव प्रथम व द्वितीय श्रेणी शहरांमध्ये देखील नेण्याचे ठरवले आहे.
क्रोमाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर श्री. शिबाशिष रॉय यांनी सांगितले, “भारतातील प्रीमियर इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक फेस्टिवल सनबर्नसोबत आमच्या टायटल पार्टनरशिपची घोषणा करून देशातील जास्तीत जास्त युवकांसोबत घनिष्ठ नाते प्रस्थापित करण्याच्या वचनबद्धतेचे आम्ही पालन करत आहोत. संगीत आणि आमच्या व्यवसायामध्ये एक स्वाभाविक नाते आहे. देशभरातील जेन झेड आणि मिलेनियल ग्राहकांसोबतचे आमचे नाते फक्त व्यवहारांपुरते मर्यादित न राहता त्यांना वैशिष्ट्यपूर्ण अनुभव प्रदान केला जावा यासाठी या भागीदारीचा उपयोग करवून घेण्याचा आमचा उद्देश आहे. सनबर्नसोबत भागीदारी केल्याचा आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या ग्राहकांसाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी आम्ही बांधील आहोत.”
स्पेसबाउन्डचे सीईओ श्री. करण सिंग यांनी सांगितले, “सनबर्नमध्ये क्रोमासोबतची भागीदारी पुढील स्तरावर नेऊन, आमचे नवे टायटल स्पॉन्सर म्हणून त्यांचे स्वागत करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त अभि