पीर्ण ग्रामसेवा मंडळ संचालित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या निकालाची उत्कृष्ट परंपरा यावर्षी देखील कायम राखली कला शाखेचा निकाल 100

.

पीर्ण ग्रामसेवा मंडळ संचालित श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयाने आपल्या निकालाची उत्कृष्ट परंपरा यावर्षी देखील कायम राखली कला शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून पाच मुले विशेष श्रेणी, प्रथम श्रेणीत पाच, तर सात मुले द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. वाणिज्य शाखेचा निकाल 95 % लागला असून पाच विशेष श्रेणी ,पाच प्रथम श्रेणी व सात मुले द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाली. वाणिज्य शाखेतून कुमारी
सुखी जयंत नाईक 93.33 % गुण मिळवून प्रथम आली,कु.प्राची प्रकाश कुबल 86.33%गुणासह द्वितीय स्थानी तर कुमारी सानिया सावंत 84.333%गुणासह तृतीय क्रमांकावर आली. .कला शाखेतून कु. निकिता रायू मांद्रेकर 87.33.% गुण मिळवून प्रथम आली , कुमार मनीष गणेश नाईक 83.33% गुण मिळवून द्वितीय स्थानी,तर कुमारी मिताली साईनाथ तळणकर 80.83%गुण मिळवून तृतीय आली.
.शिक्षक,पालक,विद्यार्थी व व्यवस्थापन यांच्या
समन्वयातून हे यश प्राप्त झाले अशी प्रतिक्रिया याप्रसंगी प्राचार्य उमेश नाईक यांनी व्यक्त केली.पीर्ण ग्राम सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री सदानंद शेट तानावडे,पालक-शिक्षक मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ फडते व ग्रामस्थानी विद्यालयाने मिळविलेल्या या भरघोस यशामुळे प्राचार्य व अध्यापक वर्गाचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar