गोव्यातील एक युवा डिझायनर कलेसाठी भारत दौरा करताना विन्सेंट वॅन गॉघ यांचा सन्मान करतात
वॅन गॉघ यांच्या ३६० डिग्री कला प्रदर्शनाचे भारतात पदार्पण झाले आणि जानेवारी २०२३ पासून वेवगेगळ्या शहरात त्याचा प्रवास चालू आहे. हा एक प्रभावी असा अनुभव असून त्यातून डच चित्रकारांच्या डायनॅमिक पूर्ण आकाराच्या ३०० खास कलाकृतींचें दर्शन घडते. प्रदर्शनाला भेट देणारे पर्यटक महान कलाकाराच्या चित्रकलेचा आस्वाद घेताना त्यावर बसू शकतात, पाठ टेकवू शकतात. हे प्रदर्शन सध्या दिल्लीत सुरू आहे.
फॅशनच्या माध्यमातून कलाकारांच्या प्रतिभेला मान देणारी एक युवा डिझायनर, गोव्यात हल्लीच झालेल्या जेडी डिझायन पुरस्कार २०२३त सहभागी झालेली जेडी स्कूल ऑफ डिझाईनची जेसिका कुलासो ही आहे.. वॅन गॉघ यांच्या, ” स्टारी नाईट्स”, कलाकृतीतून प्रेरणा घेतलेल्या विद्यार्थीनीने संध्याकाळी वापरायच्या कपड्यांचे कलेक्शन ‘अ लॅटर टू वॅन गॉघ’ निर्माण केले. या कपड्यांमध्ये आयकॉनिक कामाचे वेगवेगेळे घटक आहेत त्यात सर्वच हाताने रंगविलेले ब्रश स्ट्रोक्ससारखे प्रतिष्ठित कामाचे घटक आहेत. निळे आकाश, पिवळे आणि पांढरे वर्तुळाकार तारे आणि चंद्रकोर चंद्र यांचा त्यात समावेश आहे.
जेसिका म्हणते, ”विन्सेंट वॅन गॉघ माझे आवडते कलाकार आहेत कारण ते मला वेगवेगळ्या पद्धतीने प्रेरणा देतात. एखाद्याकडे संयम आणि आत्मियता असेल तर कोणतीही गोष्ट कला होऊ शकते. खरे म्हटले तर त्यांनी आजारी असतानाही कलेचा त्याग केला नाही ही गोष्टच मला पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते.” तिने पुढे म्हटले की, ”मला त्यांची सर्व चित्रकला आवडतात, पण माझी प्रिय अशी एक आहे, ‘द स्टारी नाईट’. खुपवेळा कला फक्त भिंतीवर दिसते, मात्र एक कलाकार म्हणून आणि एक फॅशन विद्यार्थी म्हणून मला ती दाखविण्यासाठी आणि माझी कला व्यक्त करण्यासाठी वेगळे माध्यम पाहिजे.’
जेडी डिझाईन पुरस्कार 2023मध्ये जेसिका कुलासो हिला अ लेटर टू वॅन गॉघ साठी नाविन्यपूर्ण डिझाइनरचा पुरस्कार लाभला आहे.