म्हापसा वाताहार
मांद्रे गावचा सुपुत्र आणि जवाहर नवोदय विद्यालय वाळपई चा विद्यार्थी चित्फल अतुल नाईक
यांने यावर्षी केंद्रीय बोड॑ (सीबीएसई) ने घेतलेल्या दहावी परीक्षेत ९५.२ टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला.

चित्फल याचा कल अभियांत्रिकी शिक्षणाकडे असून त्याप्रमाणे तो पुढील शिक्षण त्याच विद्यालयातून विज्ञान शाखेतून घेण्याचा त्याचा मानस आहे. त्याला मिळालेल्या यशाच श्रेय त्याने मुख्याध्यापिका बिंदु, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, आईवडिलांना दिले आहे. सातत्य आणि परिश्रमाच्या जोरावर त्याला हे यश संपादन प्राप्त झाले. मुख्याध्यापिका, शिक्षक, पालक, शिक्षक वर्ग या सर्व नी त्याचे अभिनंदन केले आहे चित्फल अतुल नाईक