म्हापसा वाताहार लोकसभा निवडणुकीसाठी अद्याप वेळ असली तरी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकतै डॉ. गुरुदास नाटेकर यांच्या नावाची जोरदार चर्चा
चालू आहे.

उत्तर गोवा मतदारसंघातून काँग्रेस चे उमेदवार डॉ गूरूदास नाटेकर इच्छूक असून त्याना तिकीट मिळाली तर एक चांगला व अनुभवी उमेदवार निवडून येऊ शकतो असे राजकीय चर्चेत सध्या बोलले जात आहे.
गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेले व अनेक क्षेत्रात कार्यरत असलेले नाटेकर यांच्या सारखे अनुभवी कार्यकतै यांना काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी तिकीट मिळावी असे बोलले जात आहे. गूरूदास नाटेकर यांच्या उमेदवारी च्या दाव्याला एक प्रकारचे बळ मिळत असल्याने चित्र सध्या दृष्टीस पडते.
काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकत म्हणून त्याची ओळख असून ते गोवा प्रदेश काँगेस समिती चे सरचिटणीस, काँगेस कार्यकारिणी सचिव अशी त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत, एवढेच नव्हे तर एक साहित्यिक, राजकारणी, हौशी नाट्य कलावंत, शैक्षणिक, सांकृतिक, सामाजिक, नाट्य आदी उपक्रमात आयोजनात पुढाकार घेणारे डॉ. गूरूदास नाटेकर उत्तर गोवा काँगेस लोकसभा ची तिकीट मिळावी असे चर्चा जोरात चालू आहे