EdTech प्लॅटफॉर्म EMBIBE व गोवा राज्य सरकार यांच्यात भागीदारी करण्यात आलेली आहे ज्यामध्ये NEP द्वारे 100% सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये AI-led संरेखित शिक्षण प्रदान केले जाईल

.

EdTech प्लॅटफॉर्म EMBIBE व गोवा राज्य सरकार यांच्यात भागीदारी करण्यात आलेली आहे
ज्यामध्ये NEP द्वारे 100% सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये AI-led संरेखित शिक्षण प्रदान केले जाईल

या भागीदारीमुळे, गोवा राज्यातील 594 सरकारी आणि अनुदानित शाळांमधील 1 लाख+ विद्यार्थी आणि 3,000+ शिक्षकांना EMBIBE च्या AI समर्थित, NEP संरेखित शिक्षणाचा विशिष्ट लाभ मिळेल.

EMBIBE द्वारे या सहकार्यातून सार्वजनिक क्षेत्रातील शैक्षणिक माध्यमातील उपक्रमाची एक सुरुवात आहे तसेच या उपक्रमांतर्गत 2023-24 शैक्षणिक वर्षादरम्यान 20 राज्यांमधील 40 दशलक्ष भारतीय विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.

 

पणजी (गोवा), मे 10, 2023: NEP (नवीन शैक्षणिक धोरण) च्या चॅम्पियनशिपमुळे भारतातील शिक्षणामध्ये खूप बदल घडून येत आहेत, त्यामुळे अभ्यासक्रमाचे रुपांतरण आणि डिजिटल लर्निंग हे एक अत्यावश्यक साधन बनले आहे.

हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता उच्च दर्जाचे डिजिटल शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी, गोवा राज्याने आज भारतातील सर्वोत्कृष्ट अग्रगण्य AI-पॉवर्ड लर्निंग प्लॅटफॉर्म EMBIBE सोबत भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीचा एक भाग म्हणून, 594 सरकारी आणि अनुदानित शाळांमधून एकूण 1 लाख+ विद्यार्थी आणि 3,000+ शिक्षक आता अत्याधुनिक कॉन्टेंट आणि ॲडॅप्टिव्ह लर्निंगसाठी AI-पॉवर्ड प्लॅटफॉर्मचा लाभ घेण्यास सक्षम होतील.

या भूमिकेसाठी EMBIBE ची राज्यव्यापी सार्वजनिक क्षेत्रातील शैक्षणिक उपक्रमातील पहिली वाटचाल आहे, जी 2023-24 शैक्षणिक वर्षात 20 राज्यांमधील 40 दशलक्ष भारतीय विद्यार्थ्यांना लाभ प्रदान करेल.

गोवा राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. प्रमोद सावंत यांनी दोन वर्षांच्या सामंजस्य कराराला मान्यता दिल्यानंतर, राज्य प्रकल्प संचालक श्री. एस. एस. घाडी, सहाय्यक संचालक-नियोजक श्री. मनोज सवाईकर, शैक्षणिक सहाय्यक संचालक श्री. मेल्विन डी’कोस्टा आणि EMBIBE चे अधिकारी यांच्या उपस्थितीत राज्याचे शिक्षण संचालनालय (DoE) श्री. शैलेश झिंगडे यांच्याद्वारे भागीदारीसाठीच्या सामंजस्य करारावर (MoU) स्वाक्षरी करण्यात आली. “राज्य शिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित करेल आणि अर्थसंकल्पाचा भाग म्हणून नवीन शैक्षणिक धोरण (NEP) लागू करेल” या नुकत्याच केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री सावंत यांद्वारे हा उपक्रम राबवण्याचा करार करण्यात आला आहे.

EMBIBE आपल्या अत्याधुनिक, पेटंट प्रोडक्ट संचाद्वारे गोव्यातील सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये शैक्षणिक अनुभव वाढवेल. EMBIBE चा वापर करून, शाळेतील शिक्षक आता फक्त त्यांच्या पाठ्यपुस्तकांशी संरेखित केलेल्या अत्याधुनिक 3D कॉन्टेंटचा वापर करून शिकवतील एवढेच नाही तर ते AI-led इंटरर्व्हेनशन वापरून प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामगिरीवर वैयक्तिकरित्या उपाय देखील करू शकतात. EMBIBE लेन्स आणि व्हर्च्युअल लॅब एक्सपेरिमेंट्स (Virtual Lab Experiments) यांसारखे ॲडव्हान्स प्रोडक्ट्स सर्व अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके एका रात्रीत स्मार्ट पाठ्यपुस्तके बनविण्यात मदत करतील आणि प्रत्येक शाळेमध्ये विज्ञानाचा वापर टर्बो चार्जरप्रमाणे चार्ज होईल.

EMBIBE स्टुडंट ॲप विद्यार्थ्यांना त्यांचे होमवर्क करण्यास सक्षम करेल, तसेच ॲपद्वारे त्यांचे वैयक्तिक मार्गदर्शन दुप्पट होईल आणि जो त्यांना सुधारित मार्ग दर्शवेल. हे सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्केटमधील इतर कंपन्यांद्वारे अत्याधिक किंमतीत पूर्वी उपलब्ध असलेले संपूर्ण EdTech प्रोडक्ट वापरण्याची परवानगी देईल.

Embibe प्रोडक्ट संच हा स्टुडंट (विद्यार्थी), टीचर (शिक्षक) आणि पेरेंट (पालक) यांच्या संपूर्ण जीवनचक्राची पूर्तता करतो आणि पायाभूत सुविधांची पर्वा न करता शाळांच्या सर्व स्तरांमध्ये प्रवेश करण्यायोग्य होण्यासाठी बदल घडवून आणत आहे.

भागीदारीच्या शुभारंभाची घोषणा करत असताना, राज्याचे प्रकल्प संचालक श्री. एस.एस. घाडी यांनी असे व्यक्त केले की, “आम्ही EMBIBE सोबत भागीदारी करून राज्य सरकार आणि सरकारी अनुदानित शाळांमधील गोव्यातील सर्व विद्यार्थ्यांना अत्याधुनिक AI-आधारित शिक्षण अनुभव प्रदान करण्यास उत्साही आहोत. EMBIBE ने आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना (कोरोनासारख्या महामारीच्या) पॅन्डेमिक काळातही खूप मोठा आधार दिला होता, तेव्हा शिक्षण हे पूर्णपणे डिजिटल माध्यमाकडे वळवावे लागले होते. आम्हाला खात्री आहे की EMBIBE समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या पार्श्वभूमीतील अनेक विद्यार्थ्यांना आवश्यकरित्या मार्गदर्शन प्रदान करेल आणि आमचे विद्यार्थी त्यांच्या 3D व्हिडिओ आणि हाय-रिझोल्यूशन इमेजद्वारे शिक्षणाच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणतील. आम्हाला विश्वास आहे की ही भागीदारी गोवा राज्यातील शिक्षणासाठी एक गेम चेंजर ठरेल आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी आमच्या चालू असलेल्या प्रयत्नांमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.”

श्री. अदिती अवस्थी, संस्थापक आणि CEO, EMBIBE, भागीदारीच्या मुख्य उद्दिष्टांवर भाष्य करताना, पुढे म्हणाल्या, “ज्यांना सर्वात जास्त गरज आहे अशा सर्व लोकांसाठी Embibe ने खरोखर प्रभावी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी 10 वर्षांचा प्रवास केला आहे. शिक्षकांचा वेळ वाचवणाऱ्या आणि क्लासरूममधील व क्लासरूम बाहेरील शिक्षणाचा दर्जा वाढवणारा सुंदर कॉन्टेंट आणि सामर्थ्यशाली वैशिष्ट्यांचा समावेश असलेल्या आमच्या प्रोडक्ट संचासह संपूर्ण गोवा राज्याला सक्षम करण्यात आम्हाला अभिमान वाटेल. AI चा इंटरप्ले, आमची समृद्ध वैशिष्ट्ये आणि सखोलपणे टॅग केलेले 3D कॉन्टेंट संपूर्ण राज्यासाठी शिकवण्याचे (टीचिंगचे) आणि शिकण्याचे (लर्निंगचे) परिणाम कसे वाढवू शकतात हे आम्ही दाखवून देण्यास अधिक उत्सुक आहोत. यापूर्वी कधीही न पाहिलेले AI कमांड सेंटर जे शिक्षण विस्तृत करण्यासाठी कार्यक्षम निर्णय घेण्यास चालना देऊ शकतात अशा गोवा राज्याचे नॉलेज पार्टनर बनण्याची आम्हाला आशा आहे.

समाप्त

EMBIBE बद्दल अधिक माहिती:

EMBIBE हे जगातील पहिले AI-led असलेले EdTech प्लॅटफॉर्म आहे जे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि वास्तविक जीवनातील परिणाम वितरीत करते आणि शिक्षकांना त्यांचे सर्वोत्कृष्ट होण्यासाठी सक्षम बनवते – सखोल शैक्षणिक कौशल्य, प्रभावी कॉन्टेंट, डिझाइन, AI आणि अभियांत्रिकी यांच्या परस्परसंवादाद्वारे तयार केले आहेत.
EMBIBE विद्यार्थ्यांना संबंधित कॉन्टेंट वितरणाच्या दृष्टीने आणि त्यांच्या तयारी दरम्यान योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने वैयक्तिकरणाच्या सर्वोच्च स्तरावर प्रवेश देते. पॉवरफुल अल्गोरिदम आणि कॉन्टेंट लायब्ररी वापरून प्रत्येक विद्यार्थ्याला 1:1 शिकवण्यासाठी शिक्षकांना सक्षम केले जाते जे त्यांना एका बटणाच्या क्लिकद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी पर्सनलाइज्ड होमवर्क सेट करण्यास सक्षम करतात. EMBIBE पर्सनलाइज्ड लर्निंग आणि लर्निंग आउटकम वितरणाच्या स्थानामध्ये 5 मंजूर पेटंट्स आणि त्याच्या नावावर अनेक प्रकाशनांसह एक आद्यप्रवर्तक आहे.

या प्लॅटफॉर्मवर सर्व शाळेंच्या बोर्डसाठी, टेस्टच्या तयारीसाठी आणि सरकारी नोकरीच्या परीक्षांसाठी, इंग्रजी, हिंदी आणि 10 मुख्य प्रादेशिक भाषांमधील 400 हून अधिक परीक्षांचा समावेश आहे. EMBIBE ने विद्यार्थ्यांना यश मिळवून देण्यासाठी AI च्या सामर्थ्याचा खऱ्या अर्थाने उपयोग करून, शैक्षणिक क्षेत्रात जागतिक इनोव्हेटर म्हणून वर्ल्ड इकोनॉमिक फोरमद्वारे मान्यता मिळण्यासह प्रभावीपणे आणि नवोपक्रमाद्वारे अनेक पुरस्कार मिळवले आहेत.
EMBIBE ने वेबी पीपल्स व्हॉइस अवॉर्ड 2022, “द बेस्ट प्लॅटफॉर्म इन लर्निंग अँड एज्युकेशन” आणि Google Play यांसह सर्वात प्रतिष्ठित इंटरनेट पुरस्कार देखील जिंकले आहेत. तसेच, ‘’द बेस्ट ऑफ युजर्स चॉईस अवॉर्ड 2021” आणि “द बेस्ट अँप फॉर पर्सनल ग्रोथ” तसेच “द बेस्ट सोल्युशन बाय एडटेक डायजेस्ट इन 2021” देखील जिंकले आहे. Embibe आणि त्याच्या गेम चेंजर प्रोडक्ट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी embibe.com या संकेत स्थळाला अवश्य भेट द्या.

मीडियाशी निगडीत प्रश्नांसाठी, खालील व्यक्तींशी संपर्क साधा:

वसुधा राव | vasudha.rao@adfactorspr.com | +91 98203 47118
भावना अकेल्ला | bhavana.akella@adfactorspr.com | +91 97047 30793

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar