डॉ. नाटेकर यांच्या २७व्या पुस्तकाचे प्रकाशन

.

डॉ. नाटेकर यांच्या २७व्या पुस्तकाचे प्रकाशन

म्हापसा, दि. १० (प्रतिनिधी) :

म्हापसा येथील साहित्यिक डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर यांच्या ‘हृदय-संवाद’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे त्यांच्या पणजी येथील सभागृहात आयोजित साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्यात या पुस्तकाचे प्रकाशन साहित्य अकादमी, दिल्ली या संस्थेच्या जनरल कौन्सिलचे सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गोमंतकीय कादंबरीकार गजानन देसाई, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, उपाध्यक्ष विठ्ठल गावस, खजिनदार राजमोहन शेट्ये उपस्थित होते.

डॉ. नाटेकर यांचे हे २७ वे पुस्तक असून, ह्या पुस्तकाला मडगाव येथील साहित्यिक पौर्णिमा देसाई यांची प्रस्तावना लाभली आहे. हे पुस्तक गोव्यातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक व आरोग्यविषयक चळवळीत प्रदीर्घ योगदान दिलेले कै. जगन्नाथ मणेरीकर यांना अर्पण करण्यात आले आहे.

डॉ. नाटेकर यांची या पूर्वी सात कादंबऱ्या, चौदा वैचारिक लेखसंग्रह, दोन नाटके, दोन कवितासंग्रह व एक संशोधनपर पुस्तक अशी एकूण सव्वीस पुस्तके प्रकाशित झालेली आहे. पुणे येथील साहित्यिक-अभ्यासक डॉ. अशोक कामत यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. नाटेकर यांच्या समग्र साहित्यावर पणजीत झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रातील निबंधांचे पुस्तक प्रकाशित झाले असून, त्याचे संपादन सुदेश आर्लेकर यांनी केले आहे.
r: फोटो कॅप्शन : साहित्यिक डॉ. गुरुदास भालचंद्र नाटेकर यांच्या ‘हृदय-संवाद’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना साहित्य अकादमी, दिल्ली या संस्थेच्या जनरल कौन्सिलचे सदस्य प्रा. डॉ. नरेंद्र पाठक, बाजूला कादंबरीकार गजानन देसाई, लेखक डॉ. गुरुदास नाटेकर, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, उपाध्यक्ष विठ्ठल गावस, खजिनदार राजमोहन शेट्ये

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें 

Avatar