पत्रकारांना सन्मान व सुरक्षिततेस सरकारने प्राधान्य द्यावे-अर्थतज्ज्ञ डॉ मनोज कामत.आय एफ डब्ल्यू जे पत्रकार संम्मेलन संपन्न.
पणजी वाताहार
देशाच्या विकासात वृत्तपत्र माध्यमांचा खारीचा वाटा असून त्यांना डावलणे कदापिही शक्य होणार नाही.परंतु सध्या सोशल मिडिया प्रभावी असले तरी त्याची विश्वासार्हता संशयास्पद आहे.स्मार्ट फोन वापरणारे पत्रकार समजू लागले असल्याने वर्तमानपत्रावरील विश्वास वाढत असल्याने,सरकारने त्यांचा सन्मान व सुरक्षितता कायद्याची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जेष्टय अर्थतज्ञ डॉ मनोज कामत यांनी केले.
इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट, गोवा तर्फे आयोजित एक दिवसीय 137 व्या सम्मेलनच्या उदघाटन सोहळ्यात मिरामार येथे बोलत होते. देशाच्या इतिहासात वर्तमानपत्रला अतुलनीय महत्व आहे.सरकारच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवण्याचे कार्य वर्तमानपत्रानी नीट बजावले आहे.लोकशाहीच्या तीन स्तंभा बरोबरच, वृत्तपत्र हा चौथा स्तंभ मानला जातो.लोकमान्य टिळकांच्या केसरीने इंग्रज सरकारला व नंतर सरकारला कडाडून विरोध केला, तो ज्वलंत धडा विसरू नये.आजच्या युगात स्वतः पत्रकार सुरक्षित नसल्याची चिंता अनेक वेळा प्रकट होत असते.मात्र त्यावर उपाययोजना करण्याचे कष्ट सरकार दाखवत नाहीत,हे दुःख आहे.गोव्यात सुहासिनी प्रभूगांवकर हिने जो दबदबा तयार केला त्याला तोड नाही व एकमेव महिला पत्रकार ज्या अध्यक्षपदी पोचल्या होत्या. त्यांच्या तसेच दोन्ही सत्कारमूर्तीचे कार्य भावी पत्रकारांना प्रेरणादायी आहे.ह्या सम्मेलनाच्या माध्यमातून हक्क मिळवून देण्याच्या कृतीला बळ मिळो,असे अर्थतज्ज्ञ डॉ मनोज कामत यांनी व्यक्त केले. या सम्मेलनाच्या सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष अवधेश भार्गवजी, सरचिटणीस संजय जैन,खजिनदार जंगा रेड्डी,प्रदेश अध्यक्ष भारत बेतकेकर उपस्थित होते.ह्या सोहळ्यात गोव्यातील जेष्टय पत्रकार सुहासिनी प्रभूगांवकर,पत्रकार सुभाष नाईक,पत्रकार प्रकाश तळावणेकर ह्याचा सत्कार करण्यात आला.देशातील पत्रकार संघटनांनी एकत्रित येत,नवी क्रांती घडवून सद्यस्थितीत राजकारण, समाजकारण आदींवर सडेतोड भूमिका घेणे आवश्यक असल्याचे मत सुहासिनी प्रभुगांवकर यांनी व्यक्त केले.पत्रकारिता हा पवित्र पेशा असून,त्यावर डाग लागेल असे कृत्य करू नका.सवंग प्रसिद्धीचा मोह टाळून,सत्य समोर मांडा व प्रतिष्ठा वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची क्षमता दाखवा असे जेष्टय सुभाष नाईक यांनी सत्काराबद्दल भावना व्यक्त केल्या.यावेळी त्यांना शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले.राष्ट्रीय अध्यक्ष भार्गवजी यांनी देशांतील पत्रकारांच्या सुरक्षेबाबत कायदा व योग्य वेतन आयोग,स्थापन करण्याची गरज व्यक्त केली व त्यासाठी प्रत्येक राज्यातील संघटनेने निवेदने देऊन दबाव वाढवावा असे व्यक्त केले.यावेळी संघटनेतर्फे डॉ मनोज कामत याना सन्मानचिन्ह देण्यात आले.स्वागत प्रदेश अध्यक्ष भारत बेतकेकर यांनी केले,पाहुण्यांची ओळख चंद्रहास दाभोलकर, सत्कारमूर्तीचा परिचय नारायण खोर्जुवेकर,पाहुण्यांचे स्वागत संजय विर्नोडकर, तुकाराम शेटगावकर यांनी केले.समारोपाच्या सत्रात दैनिक हेराल्डचे संपादक अवित बगळे व प्रमुख पाहुणे डॉ गुरुदास नाटेकर उपस्थित होते.समाजाला दिशादर्शक हे पत्रकार व वर्तमानपत्र असते.मात्र अनेकवेळा पत्रकारावर हल्ले होत असते,वेगळीच स्थिती दिसून येते.त्यासाठी सरकारने वेळीच उपाययोजना करून पत्रकारांना सुरक्षकवच पुरवले पाहिजे,असे बगळे यांनी व्यक्त केले. पत्रकार हे समाजातील घडणाऱ्या बर्या वाईट गोष्टी वाचकांपर्यंत पोचवत असतात.कधीकाळी त्यांना संकटाशी मुकाबला करावा लागतो, ह्यासाठी सरकारने समस्या समजून कार्य करावे असे आवाहन डॉ नाटेकर यांनी केले.
यावेळी डॉ नाटेकर व संपादक अवित बगळे याना सन्मानचिन्ह देण्यात आले.प्रदीप सावंत यांनी निवेदन तर शेवटी अध्यक्ष भारत बेतकेकर यांनी आभार मानले.