*वेद व ध्यान साधना गोवा चा उपक्रम* *पर्वरी येथे ७ दिवसीय वेदिक मंत्र प्रशिक्षण शिबीर*

.

*वेद व ध्यान साधना गोवा चा उपक्रम*
*पर्वरी येथे ७ दिवसीय वेदिक मंत्र प्रशिक्षण शिबीर*
हळदोणा वाताहार
वेद व ध्यान साधना गोवा, पर्वरी विभागामार्फत दिनांक १८ मे ते २५ मे दरम्यान ८ ते २१ वयोगटातील मुलांकरिता मोफत वैदिक मंत्र शिबीर दत्त मंदिर, सुकुर,पर्वरी येथे आयोजित करण्यात आले होत व ह्या शिविरामध्ये ९८ विध्यार्थ्यानी तसेच पालकांनी सहभाग घेतला.

वेद व ध्यान साधना गोवा चे वेद गुरु श्री प्रसाद देशमुख ह्यांनी ह्या शिबिराला ७ दिवस मार्गदर्शन केले. ह्या शिबिरामध्ये भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या वेदांचे महत्व तसेच वेद वेद मंत्रांचा योग्य उच्चार अर्थासहित विद्यार्थ्यांना शिकवण्यात आला. श्री देशमुख ह्यांनी ओमकारची निर्मिती तसेच ओमकार पठाणांची योग्य पद्धती व त्याचा बुद्धीवर तशीच शरीराच्या प्रत्येक अवयवांवर होणाऱ्या सकारत्मक प्रभावाविषयी माहिती व प्रशिक्षण दिले.

वेद मंत्रांचे महत्व व त्याच्या उच्चरांची योग्य पद्धती व शास्त्रीय कारण ह्या शिबिरामध्ये मुलांना शिकवण्यात आले तसेच भारतीय संस्कृतीचे विविध पेहेलूनवार श्री देशमुख ह्यांनी ह्या ७ दिवसीय शिबिरामध्ये प्रकाशझोत टाकला

ह्या शिबिरामध्ये ओमकार पठण, गणपती प्रार्थना मंत्र तसेच विद्यार्त्यांसाठी शैक्षणिक दृष्टया महत्वाचा असणारे मेधा सूक्तम व वैश्विक शांतीसाठीचा मंत्रांचे प्रशिक्षण दिले गेले.

ह्या शिबिराच्या सांगता समारोहास श्री दत्त मंदिर सुकुर,पर्वरीचे मंदिर संस्थापक श्री संदीप वझरकर, शिवदास वझरकर व पर्वरी विभागाच्या सेविका सौ रिचा वझरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दिलीप महाले, सेवक विलास पिलणकर व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें