बास्किन रॉबिन्सतर्फे गोव्यात १७ नवीन उत्पादने सादर
गोवा, २९ मे : जगातील सर्वात मोठ्या आईस्क्रीम चेनपैकी एक बास्किन रॉबिन्सला गोव्यात आईस्क्रीमची मागणी वाढताना दिसून येत आहे. चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीला उतरण्यासाठी, वाढती मागणी आणि नवनवीन लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बास्किन रॉबिन्सने रोमांचक नवीन स्वरूप आणि फ्लेवर्ससह आपली उत्पादन श्रेणी आणखी वाढवली आहे. ब्रँडने अलीकडेच या उन्हाळी हंगामासाठी आपल्या सर्व पार्लर्समध्ये १७ नवीन उत्पादने सुरू करण्याची घोषणा केली.
या १७ नवीन उत्पादनांमध्ये फक्त नवीन फ्लेवर्सच नाहीत तर अनेक नवीन आइस्क्रीम प्रकार आणि कॅटेगरी यांचाही समावेश आहे. नवीन श्रेणीचा एक भाग म्हणून सादर केले जाणारे आइस्क्रीम रॉक्स हे चवदार चॉकलेटचा कोट असलेले बाईट आकाराचे आइस्क्रीम असून ते दोन फ्लेवर्समध्ये उपलब्ध असेल. आइस्क्रीम पिझ्झा मध्ये आजवर कधी पाहिला नसेल अशा अवतारातील पिझ्झासोबत आइस्क्रीमचे मिळेल. रिफ्रेशिंग आइस्क्रीम फ्लोट्स देखील आहेत तसेच फ्रूट क्रीम संडे आणि अगदी फेयरीटेल संडे जसे मरमेड आणि युनिकॉर्न संडे हे प्रकारही आहेत. नवीन फ्लेवर्समध्ये कॅरॅमल मिल्क केक, ब्लूबेरी आणि व्हाइट चॉकलेट तसेच फ्रूट निन्जा यांचा समावेश आहे. ब्रँड पारंपरिक किरकोळ आणि आधुनिक व्यापारी आउटलेट्समध्ये देखील ब्रॅंडचे काम व्यवस्थित चालले आहे. ब्राउनी संडे कप, इटालियन कुकीज सह फनविच सँडविच आणि आइस्क्रीम रॉक्ससह सारखी त्याची अनेक नवीन उत्पादने सुरू झाली आहेत आणि खवय्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय होत आहेत.
बास्किन रॉबिन्सचे गोव्यात आधीच 22 पार्लर आहेत. हे राष्ट्रीय स्तरावर 850 हून अधिक स्थाने चालवते. दरवर्षी आणखी 3 नवीन पार्लर जोडून गोव्यात आपला ठसा आणखी वाढवण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे आणि यावर्षी राष्ट्रीय स्तरावर १०० पेक्षा जास्त स्टोअरची भर घालण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. ब्रँड सातत्याने त्याचे नेटवर्क वाढवत आहे तसेच उत्पादने आणि उद्दिष्ट केंद्री विपणन उपक्रमांद्वारे चांगल्या विचारातून तरुण ग्राहकांमध्ये त्याचे आकर्षण वाढवत आहे. जोडीला ब्रँड सर्व आघाडीच्या सुपरमार्केट चेन आणि मॉडर्न ट्रेड स्टोअर्स तसेच आघाडीच्या जनरल ट्रेड स्टोअर्स आणि हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स इत्यादी खाद्य सेवा दालनातून किरकोळ विक्री करत आहे.
ब्रँड केवळ त्याच्या पार्लरमध्ये प्रत्यक्ष येऊन खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येवरूनच नव्हे तर त्याच्या ऑनलाइन विक्रीमध्येही स्थिर वाढ पाहत आहे. आता त्यांची सुमारे एक तृतीयांश विक्री ऑनलाइन आणि स्वीगी, झोमॅटो, इनस्टामार्ट, बिग बास्केट, झेप्टो यासारख्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवरुन होत आहे.
ग्राहकांच्या प्राधान्यांबद्दल बोलताना ग्रॅव्हिस फूड्स प्रायव्हेट लिमिटेड- बास्किन रॉबिन्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित खट्टर म्हणाले, “व्यवसाय वाढवण्याच्या प्रयत्नांमध्ये आइस्क्रीममधील नावीन्य आम्ही केंद्रस्थानी ठेवले आहे. जे ग्राहकांनी याआधी भारतात पाहिले नसेल अशी सर्वोत्तम उत्पादने, उत्कृष्ट गुणवत्ता आणि स्वरूप आणण्यावर आमचा भर आहे. आमचे नवीन समर कलेक्शन सादर करताना आम्हाला खूप आनंद होत आहे आणि देशभरात ग्राहक या उत्पादनांचा आनंद लुटतील यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
गोव्यात व्हॅनिला, कॉटन कँडी आणि मिसिसिपी मड सारख्या फ्लेवर्स खूप लोकप्रिय आहेत, त्यानंतर मिसिसिपी मड आणि बेल्जियन ब्लिस सारख्या चॉकलेटवर आधारित फ्लेवर्स आहेत. आमचे गुलाब जामुन आईस्क्रीम कोलकातामध्ये अल्पावधीतच खूप लोकप्रिय झाले आहे. संडे आणि आइस्क्रीम केकची स्थिर आणि वाढती मागणी देखील बीआरने पाहिली आहे. शहरातील तरुण ग्राहक आणि प्रयोगांची उच्च पातळी लक्षात घेता सीझनल स्पेशल गोष्टींना येथे चांगली साथ मिळते. त्यामुळे बास्किन रॉबिन्सना उन्हाळ्यात येणाऱ्या या नवीन सादरीकरणाकडून मोठ्या अपेक्षा असणे स्वाभाविक आहे.”
बास्किन रॉबिन्स या वर्षी भारतात ३० वर्षे पूर्ण करत आहेत आणि ८५० हून अधिक स्टोअर्ससह २३९ हून अधिक शहरांमध्ये उपस्थित आहेत. नवीन उत्पादने सर्व पार्लरमध्ये उपलब्ध असतील. आईस्क्रीम रॉक्स सारखी उत्पादने आघाडीच्या रिटेल स्टोअर्स, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि वितरण भागीदारांद्वारे देखील उपलब्ध असतील.