*केंब्रिज इंटरनॅशनलच्या देशभरातील विद्यार्थ्यांनी मार्च २०२३ परीक्षेत उल्लेखनीय निकालांसह केली चमकदार कामगिरी*
केंब्रिज इंटरनॅशनल या भारतातील व जगभरातील ५ ते १९ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या सर्वात मोठ्या संस्थेने केंब्रिज इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन (आयजीएससीई) आणि केंब्रिज इंटरनॅशनल एएस अॅण्ड ए लेव्हलसाठी मार्च २०२३ परीक्षेच्या निकालांची घोषणा केली आहे.
देशभरातील ३७९ शाळांमधून ६५,१५७ प्रवेशिका सबमिट होण्यासह मार्च २०२३ परीक्षेमध्ये भारतातील केंब्रिज इंटरनॅशनल विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सर्वोत्तम निकालांची नोंद केली आहे. केंब्रिज आयजीसीएसईने ५ टक्क्यांची वाढ केली, तर केंब्रिज इंटरनॅशनल एएस अॅण्ड ए लेव्हलने १२ टक्के वाढ केली. गेल्या वर्षातील ४५,००० प्रवेशिकांच्या तुलनेत वर्ष २०२२-२३ साठी ४७,८०० प्रवेशिका सबमिट करण्यात आल्या. तसेच केंब्रिज इंटरनॅशनल एएस अॅण्ड ए लेव्हलने १२ टक्क्यांची वाढ करण्यासोबत गेल्या वर्षातील १३,८३३ प्रवेशिकांच्या तुलनेत वर्ष २०२२-२३ साठी १५,६०० प्रवेशिका सबमिट केल्या.
गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्रथम भाषा इंग्रजी व जीवशास्त्र हे सर्वात लोकप्रिय केंब्रिज आयजीसीएसई विषय होते, तर गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अर्थशास्त्र व व्यवसाय हे केंब्रिज इंटरनॅशनल एएस अॅण्ड ए लेव्हलसाठी सर्वात लोकप्रिय विषय होते.
दरम्यान, एकूण २५,५३९ हून अधिक प्रवेशिकांसह एसटीईएम विषयांसाठी प्रवेशिकांमध्ये ६ टक्के वाढीमधून निदर्शनास येते की, भारतातील विद्यार्थ्यांचा या विषयांप्रती कल वाढत आहे.
केंब्रिज इंटरनॅशनलचे दक्षिण आशियामधील प्रादेशिक संचालक महेश श्रीवास्तव म्हणाले, ‘‘केंब्रिज इंटरनॅशनलला मार्च २०२३ परीक्षेसाठी भारतातील आमच्या विद्यार्थ्यांनी संपादित केलेल्या निकालांची घोषणा करण्याचा अभिमान वाटतो. यंदाचे आमचे निकाल उल्लेखनीय आहेत. हे विद्यार्थी, शिक्षक, सहाय्यक कर्मचारी व पालकांचे सांघिक प्रयत्न आहेत, ज्यांनी सहयोगाने सुरेख कामगिरी करत हे उल्लेखनीय निकाल संपादित केले आहेत, ज्याचा आम्हाला अभिमान आहे. विद्यार्थी या उच्च कामगिरीसह त्यांच्या जीवनातील पुढील टप्प्याकडे वाटचाल करू शकतात. सर्वांचे अभिनंदन!’’
मार्च परीक्षा भारतीय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे. ही परीक्षा त्यांना स्थानिक युनिव्हर्सिटी प्रवेश मर्यादा पार करण्याची सुविधा देते. निकाल जाहीर होण्याने केंब्रिजचे देशभरातील हजारो विद्यार्थी आता भारत, यूएस व यूकेमधील युनिव्हर्सिटीज व कॉलेजमध्ये, तसेच युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
केंब्रिज पाथवे अभ्यासक्रम केंब्रिज आयजीसीएसई येथे ७० हून अधिक विषय आणि केंब्रिज इंटरनॅशनल एएस अॅण्ड ए लेव्हल येथे ५५ हून अधिक विषय देण्यासह प्रत्येक वर्षी तीन परीक्षा सिरीज निवडण्याची सुविधा देतो. ही स्थिरता व निवड केंब्रिज अभ्यासक्रम व पात्रतांना भारतातील ६५० हून अधिक शाळांसाठी पसंतीचा पर्याय बनवतात. सध्या, केंब्रिज अभ्यासक्रम व पात्रता देणाऱ्या भारतात ६५० हून अधिक शाळा आहेत.