स्मार्ट सिटी अंतर्गत बसगाड्यांऐवजी पणजीच्या रहिवाशांसाठी होड्या खरेदी करा ः युवक काँग्रेस

.

स्मार्ट सिटी अंतर्गत बसगाड्यांऐवजी पणजीच्या रहिवाशांसाठी होड्या खरेदी करा ः युवक काँग्रेस
पणजी ः पावसाळ्यापूर्वी संपण्याची शक्यता नसलेल्या पणजीतील स्मार्ट सिटीच्या अपूर्ण कामाविषयी आणि सिवरेजच्या कामाविषयी युवक काँग्रेसने मुख्यमंत्र्यांना टोमणा मारला आहे.
दक्षिण गोवा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेश नाडर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, सरकारने प्राधान्यक्रम चुकविल्याने सध्याची गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यांचे निवेदन खालीलप्रमाणे ः
राज्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी २० नव्या इलेक्ट्रीक बसगाड्यांना आरंभ केला. बसगाड्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी पणजीतील रहिवाशांसाठी येत्या पावसाळ्यात वॉटर टॅक्सी सेवा सुरू करणे योग्य ठरले असते. शहरातील अपूर्ण काम, उघडे खड्डे आणि न झाकलेले गटार यात पडून कोणाला जीव गमावण्याची वेळ येऊ नये.
शहरातील रस्त्यांची अवस्था एवढी खराब होणार आहे की, एखाद्याला बस सोडा, स्वतःचे वाहन किंवा सायकल चालवून अथवा चालत जात घरी अथवा कामाच्या ठिकाणी जाणे
शक्य होणार नाही. त्यामुळे सरकारने पणजीच्या रहिवाशांसाठी होड्या उपलब्ध करून देऊन रहिवाशांना शहरात अथवा बाहेर जाण्यासाठी मदत करणे योग्य ठरेल.
मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी २० नव्या बसगाड्या सुरू करण्याच्या कार्यक्रमात या गाड्या स्मार्ट सिटी अंतर्गत खरेदी केल्याचे सांगितले होते.
गेले वर्षभर पणजीतील रहिवाशी अडचणींना सामोरे जात असून, स्थानिक आमदार मात्र त्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आहे. राज्य सरकारने अनेक आंतरराष्ट्रीय उपक्रम आयोजित केल्या जाणाऱ्या या शहराच्या दुर्दशेकडे अजिबात लक्ष दिले नसून, केवळ मतपेढीवर लक्ष ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या भरवशावर पमणजीतील रहिवाशांना सोडले आहे.
पावसाळा जवळ येऊन ठेपला असताना, अचानक अखेरच्या क्षणी स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदलला असून, आता काही दिवसांत हे काम पुर्णत्वास नेण्याचे अशक्य काम त्यांना सोपविले आहे. ते काही भऱीव काम करू शकेल असे वाटत नाही. यावरून राज्य सरकारच्या अपयशाचा प्रत्यय येत असून सत्तास्थानी असलेल्यांच्या प्रशासकीय क्षमतेबद्दल शंका निर्माण होत आहे. या कामी आलेले अपयश आणि चुका मान्य करण्याऐवजी सत्ताधारी भाजप पक्ष जनतेच्या संयमाची कसोटी पाहात जनतेच्या सहनशक्तीची परीक्षा पाहात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. सारा गोंधळ दडपून काहीच गंभीर नसल्याचा आव आणला जात आहे.
सध्याची पणजीची अवस्था पाहाता, कोणतीही जाहिरात अथवा फलक लावून हा गोंधळ झाकला जाऊ शकत नाही. आमची मागणी आहे की, अखेरच्या क्षणी अधिकारी बदलून काहीही होणारे नाही, त्याऐवजी हा गोंधळ घालून सामान्य माणसाचा जीव धोक्यात घालण्यास जे जबाबदार असतील, त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करायला हवा.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें