म्हापसा वाताहार——————————————————
————————————————————-
वेद व ध्यान साधना गोवा द्वारा
शैक्षणिक यशप्राप्ती व लोक कल्याणाकरिता, “मेधाशक्ती वेदमंत्र पारायण सोहळा”
वेद व ध्यान साधना गोवा द्वारा गोव्याच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणसंस्था ह्याच्या साठी येणाऱ्या शैक्षणिक वर्षात ज्ञान व यश प्राप्ती करिता शनिवार दिनांक ३ जुन २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता देव बोडगेश्वर संस्थान सभागृह म्हापसा येथे सर्वांसाठी मेधाशक्ती वेदमंत्र पारायण सोहळा आयोजित केला आहे, व ह्या वैदिक आशीर्वाद प्राप्ती सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वेद व ध्यान साधना गोवाचे वेदगुरू श्री प्रसाद देशमुख ह्यांनी व सर्व सेवक सदस्यांनी केले आहे.
वेद व ध्यान साधना गोवा, म्हापसा व पर्वरी विभागामार्फत आयोजित ह्या वैदिक संस्कारासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षणसंस्था पदाधिकारी ह्यांच्या यशाकरिता विशेष वेद मंत्र पठन, वेद व ध्यानसाधना चे विद्यार्थी व साधकांमार्फत केले जाणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा वेद मंत्र हे मुख्य आधार आहेत व वैदिक संस्कृतीनुसार विद्यार्थी नवीन वर्षाचा अभ्रासक्रम सुरू करण्यापूर्वी त्यांना वेद मंत्रांद्वारा आशीर्वाद देण्याची प्रथा आहे, व ह्या धर्तीवर प्रथमच शैक्षणिक यश व ज्ञानप्राप्ती साठी वेद मंत्र घोष सामूहिक रित्या गोव्यामध्ये केल्या जाणार आहे.
ह्या मेधाशक्ती वेदमंत्र पारायनामध्ये श्री गणपती मंत्र, अतिशय प्रभावी असे मेधा सुक्तम मंत्राच्या घोषासहित, सर्वांच्या कल्याणाकरिता स्वस्ति मंत्राचे पठन सुद्धा ह्या सोहळ्यामध्ये केले जाणार आहे. मेधा सुक्तम हे एक प्रभावी असे सुक्तम आहे ज्याच्या पठणाने अथवा एकाग्रतेने ऐकल्याने आत्मिक शक्ती, बॊधिकशक्ती, स्मरणशक्ती, विषय समजून घेण्याची शक्ती, कलात्मक शक्ती अश्या प्रकारच्या मेधा शक्ती प्राप्त होतात ज्यामुळे व्यक्ती मेधावी बनतो.
वेद व ध्यान साधना गोवा द्वारे, गोव्यामध्ये वेदांचा प्रचार व प्रसार करण्याचे कार्य केले जाते, व त्याद्वारे विध्यार्थी तसेच वयस्करांकरिता वैदिक मंत्र अर्थासहित मोफत शिकवण्याचे कार्य केल्या जाते, तसेच वेद मंत्रांचा शास्त्रीय आधार ह्या वर्गामध्ये साधकांना शिकवल्या जातो.
वेद व ध्यान साधना गोवाचे वेदगुरू श्री प्रसाद देशमुख, तसेच सेवक सौ रुपाली गौडाळकर, रिचा वझेकार, दिलीप महाले, विलास पिलनकर ह्यांनी गोव्यातील जास्तीत जास्त लोकांनी ह्या “मेधाशक्ती वेदमंत्र पारायनाचा लाभ घ्यावा म्हणून आवाहन केले आहे.
शैक्षणिक यशप्राप्ती व लोक कल्याणाकरिता, “मेधाशक्ती वेदमंत्र पारायण सोहळा”
.
[ays_slider id=1]