*वेद व ध्यान साधना गोवाद्वारा आयोजित* *लोककल्याण मेधाशक्ती वेदमंत्र पारायण सोहळा

.

*वेद व ध्यान साधना गोवाद्वारा आयोजित*
*लोककल्याण मेधाशक्ती वेदमंत्र पारायण सोहळा संपन्न*

वेद व ध्यानसाधना गोवा म्हापसा व पर्वरी विभागामार्फत च्या वतीने शैक्षणिक यशप्राप्ती व लोककल्याणाकरिता मेधाशक्ती वेदमंत्र पारायण सोहळा दिनांक ३ जून २०२३ रोजी देव बोडगेश्वर सभागृहामध्ये पार पडला व ह्या सोहळासाठी अध्यक्ष म्हणून श्री सदानंद शेट तानावडे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी, शिक्षण संचालक श्री शैलेश झिंगडे, शिक्षण उप संचालक श्री मनोज सावईकर व वेद व ध्यासाधनाचे वेदगुरु श्री प्रसाद देशमुख उपस्थित होते.

येणाऱ्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणसंस्था, प्रशासन व पालक ह्यांना ज्ञानप्राप्ती, यशप्राप्ती व लोककल्याणाकरिता ह्या विशेष वैदिक पठाणाचे आयोजन वेद व ध्यानसाधना गोवा मार्फत करण्यात आले होत. वेद व ध्यानसाधना गोवा परिवाराचे मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक व साधकांनी गणपती मंत्र, सर्वशक्तिशाली मेधासुक्तम व सर्वांच्या कल्याणासाठीच्या स्वस्ति मंत्राचे पारायण वैदिक पदतीने केले व ह्या वेद मंत्राद्वारे गोव्याच्या विद्यार्थी, शिक्षक, शिक्षणसंस्था ह्याच्या यशासाठी वैदिक मंत्रांद्वारे प्रार्थना करून लोककल्याणासाठी वेदपुरुषाकडे प्रार्थना करण्यात आली.

वेदगुंरु श्री प्रसाद देशमुख म्हणाले कि, गोव्याच्या कानाकोपऱ्यात सामान्य जणांना वेदमंत्रांचा लाभ व्हावा व प्रत्येक कुटुंबामध्ये मंत्राचा पठन व्हावं हा वेद व ध्यानसाधना गोवा चा मुख्य उद्देश आहे. ते पुढे म्हणाले, वेद मंत्राच्या पठणांनी मनुष्याचा अध्यात्मिक तसेच लौकिक विकास होतो व शात्रशुद्ध पद्धतीने वेद मंत्र पठन केल्यास त्याचा मनुष्याच्या मन, बुद्धी व शरीरावर तसेच सभोवतालच्या वातावरणावर सकारात्मक परिणाम होतो.

*वेद व ध्यान साधनेचा संकल्प*
येणाऱ्या डिसेंबर २०२३ पर्यंत ५००० शालेय विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक व सभोवतालच्या वातावरणासाठी पूरक असलेल्या वैदिक मंत्रांचे प्रशिक्षण विद्यार्थी व शिक्षकांना देण्याचा मानस आहे ह्या मंत्रांसहित त्याच्या अर्थ व त्याचे मूल्य ह्या माध्यमातून शिकविले जाईल.

उप शिक्षण संचालक श्री मनोज सावईकर म्हणाले कि, आपल्या भारतीय संस्कृती मध्ये वेदांचे अनन्यसाधारण महत्व आहे व ते जन माणसापर्यंत पोहचणे आवश्यक आहे तसेच वेद मंत्रांचे जरअर्थासहित शिक्षण मिळाले तर विद्यार्थ्यांमध्ये तसेच कुठल्याही व्यक्ती मध्ये परिवर्तन घडू शकते.

ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सदानंद तनावडे ह्यांनी वेद व ध्यानसाधाचे विद्यार्थ्यांनी केलेल्या वेद पठणाचे कौतुक केले व अश्या प्रकारचे वेद पठन सर्वत्र होणे आवश्यक आहे जेणेकरून आपली भारतीय संस्कृतीचे जे बेज आहेत ते मुलांपर्यंत पोहचतील व ते एक सुसंकृत नागरिक म्हणून त्यांचे व्यक्तिमत्व बनेल असे ते म्हणाले. आजच्या पिढीला जर चांगले संस्कार मिळाले तर भविष्यात ते त्याच्या वडीलधाऱ्या लोकांचा मान ठेवतील व ह्या करिता आपल्या भारतीय संस्कृती मध्ये अतिशय महत्वाचे असलेल्या वेदांचा अभ्यास व्हायला हवा व त्याच्या शिकवणुकीचा अंगीकार व्हावा, वेद मंत्र पठणांनी थकवा दूर होऊन एक ऊर्जा प्राप्त होते व तो अनुभव मला इथे आला तसेच विद्यार्त्याना एकाग्रताशक्ती ह्यातून प्राप्त होऊ शकते व त्यामुळेच गोव्यातल्या शाळा मध्ये वेदमंत्र पठण शिकवलं जायला पाहिजे. आज भारतीय संस्कृतीचा अंगीकार जगामध्ये केला जातो जसे कि आयुर्वेद, योगशक्ती व ह्या गोष्टी आपण आपल्या देशातील लोकांनी करावा असे श्री सदानंद तनावाडे म्हणाले.

ह्या पारायण सोहळ्यासाठी मोठ्यासंख्येने विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षणसंस्थांचे पदाधिकारी म्हापसा व पर्वरी परिसरातून उपस्थित होते

वेद व ध्यान साधना गोवा चे सेवक सौ रुपाली गौंडाळकर, सौ रिचा वझरकर, दिलीप महाले, विलास पिलणकर, सचिन राऊळ, सौ सुषमा चोडणकर, लिंदा नागवेकर, सौ सोनल पिलणकर ह्यांनी परिश्रम घेतले तसेच ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ माया कामात व येशवंत शेट्ये ह्यांनी केले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें