गोवा इन्फोटेकचे चेअरमन तथा आमदार चंद्रकांत शेट्ये यांचा गौरव,सर्व थरांतून अभिनंदन
म्हापसा प्रतिनिधी
गोवा इन्फोटेक कॉर्पोरेशनचे चेअरमन तथा डिचोली मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांचा आयएफडब्ल्यूजे संघातर्फे अध्यक्ष भारत बेतकेकर यांनी गौरव केला.
इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट, गोवा प्रांतातर्फे हा सोहळा पार पडला. इन्फोटेक क्षेत्रांत तसेच गोव्याच्या भूमीत नामांकित नेत्रतज्ञ म्हणून नाव कमावले.नेत्र आजारावर हमखास उपाय व गरजूंना मोफत चिकित्सा व नेत्र शस्त्रक्रिया करून डॉ शेट्ये यांनी समाजाचे ऋण फेडले तसेच जनमानसात नाव कमावले त्याबद्दल आयएफडब्ल्यूजे संघाने त्याचा खास गौरव केल्याचे अध्यक्ष भारत बेतकेकर यांनी व्यक्त केले.गोवा इन्फोटेक कॉर्पोरेशनचे चेअरमन तथा आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांच्या उत्कृष्ट कार्यशैली व समाजातील गरीब लोकांप्रती कळवळा व आपुलकीने वागण्याची संयमी वृत्तीमुळे आदराचे स्थान निर्माण केले आहे.त्याच्या हातून नवनवीन प्रयोग व उपक्रम घडून येवोत,त्याद्वारे गोवा सर्वांगसुंदर राज्य व्हायला हवे,आमदार डॉ शेट्ये यांना भावी वाटचालीस शुभेच्छा असल्याचे पत्रकार चंद्रहास दाभोलकर यांनी व्यक्त केले.त्यांना शाल,श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.आयएफ डब्ल्यूजेचे राष्ट्रीय अध्यक्ष अवधेश भार्गवजी व राष्ट्रीय सरचिटणीस संजय जैन यांनी डॉ शेट्ये याना शुभेच्छा दिल्या.शेवटी अध्यक्ष भारत बेतकेकर यांनी आभार मानले.
फोटो