सोनीने मग्न करणाऱ्या इमर्सिव्ह ध्वनीसह अप्रतिम पिक्चरसाठी ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) मालिका बाजारात

.

सोनीने मग्न करणाऱ्या इमर्सिव्ह ध्वनीसह अप्रतिम पिक्चरसाठी ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) मालिका बाजारात आणली
नवी दिल्ली, २ जून २०२३: सोनी इंडियाने पिक्चरची अप्रतिम गुणवत्ता आणि अप्रतिम ध्वनीसह नवीन ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) टेलिव्हिजन मालिकेची आज घोषणा केली. नवीन ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) टेलिव्हिजन मालिका द्रुक् व श्राव्य दोन्ही गोष्टींना एका वेगळ्या वरच्या स्तरावर घेऊन जाते आणि चित्र व ध्वनीच्या प्रगत तंत्रज्ञानाद्वारे गूगल टीव्ही च्या माध्यमातून मनोरंजनाच्या जगालाच सुंदर रंगांमध्ये साक्षात जिवंत करते.
X1 4K एचडीआर पिक्चर प्रोसेसरसह उल्लेखनीय पिक्चर गुणवत्तेचा अनुभव घ्या
सोनीचे नवीन एक्स८२एल (X82L) टीव्ही सिरीज १३९ सेमी (५५ इंच), १६४ सेमी (६५ इंच), १८९ सेमी (७५ इंच) मध्ये उपलब्ध आहे. नव्याने बाजारात आलेल्या या मालिकेत X1 4K एचडीआर पिक्चर प्रोसेसरचा समावेश आहे, जो ऑब्जेक्ट आधारीत एचडीआर रिमास्टरसह तल्लीन करून टाकणारा पाहण्याचा अनुभव देतो. बहुतेक टेलिव्हिजनच्या उलट, ज्यांच्यामध्ये काँट्रास्ट केवळ एका काळ्या-पांढऱ्या वक्रामध्येच समायोजित केला जातो, स्क्रीनमधील एकेका घटकाच्या रंगांचा अभ्यास करून विश्लेषण केले जाते आणि मग काँट्रास्ट समायोजित केले जाते. कारण या मध्ये घटक वैयक्तिकरित्या रिमास्टर केले जाते, त्यामुळे हा टिव्ही अधिक खोली, अधिक चांगली पोत आणि जास्त वास्तववादी चित्रे पुनरुत्पादित करू शकतो.
डॉल्बी व्हिजनTM आणि डॉल्बी अॅटमॉसTMसह सिनेमाचा थरार अनुभवा
नवीन ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) डॉल्बी व्हिजनTM सह समर्थित असून ते एचडीआर सोल्युशन आहे, जे तुमच्या घरामध्ये आकर्षक हायलाइट्स, गडद आणि व्हायब्रंट रंगांसह दृश्यांना अक्षरशः जिवंत करणारा एक इमर्सिव्ह, आकर्षक सिनेमॅटिक अनुभव तयार करते. डॉल्बी अॅटमॉसTMसह नवीन ब्रॅव्हिया एक्स८२एल ४के (BRAVIA X82L 4K) टेलिव्हिजनमधील आवाज वरुन आणि बाजूनी येतो, त्यामुळे तुम्हाला खरोखर बहुआयामी अनुभवासाठी अधिक वास्तववादासह अधिक जास्त ताकदीने व गुणवत्तेने आवाज ऐकू येते.
नवीन X82L टीव्ही मालिकेमध्ये X बॅलेन्स्ड स्पीकर आणि अकॉस्टिक मल्टी ऑडिओद्वारे भरून टाकणाऱ्या आवाजाचा अनुभव घ्या
X बॅलेन्स्ड स्पीकर हे वैशिष्ठ्य नवीन X82L टीव्ही मालिकेमध्ये त्याच्या अद्वितीय नवीन आकार, ड्राइव्ह चित्रपटे आणि स्पष्ट आवाजासोबत संगीत यासर्वांसह या टेलिव्हिजनच्या आवाजाच्या गुणवत्तेला आणि स्लिम आकाराला पूरक ठरण्यासाठी डिझाईन केले आहे. अकॉस्टिक मल्टी ऑडिओ तंत्रज्ञानामध्ये टेलिव्हिजनच्या मागील बाजूस ध्वनी पोसिशनिंग ट्वीटर समाविष्ट आहेत जे खरोखर मग्न करणाऱ्या अनुभवासाठी सक्षम करते.
X82L मालिका गूगल टीव्हीसह स्मार्ट वापरकर्ता अनुभव देते, जी 700,000 हून अधिक चित्रपट आणि टीव्ही सिरीजसह 10,000 हून अधिक अॅप्स आणि गेम्सद्वारे अखंड मनोरंजन देते. हे अॅपल एयरप्ले 2 (Apple Airplay2) आणि होमकिट (HomeKit) बरोबर देखील हे सहजतेने व अखंड काम करते.
नवीन ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) मालिकेच्या माध्यमातून १०,००० हून जास्त अॅप्स डाउनलोड करा, ७००,००० पेक्षा जास्त चित्रपट आणि टीव्ही मालिका तसेच लाइव्ह टीव्ही हे सर्व एकाच ठिकाणी पहा. गूगल टीव्ही सर्व अॅप्स आणि सबस्क्रिपशन्समधून प्रत्येकाचे आवडते कन्टेंट आणते आणि त्यांना व्यवस्थापित करते. यामध्ये शोधणे सोपे आहे- फक्त गूगलला विचारा. अॅप्सवर शोधण्यासाठी “ओके गूगल, अॅक्शन चित्रपट शोध” असे म्हणून पहा. फोनवर वॉचलिस्ट जोडून ग्राहक वैयक्तिकृत शिफारसी आणि बुकमार्क शो व चित्रपट पाहण्यासाठी हवे ते सहज शोधू शकतात आणि ते टीव्हीवर पाहू शकतात व काय पहायचे आहे याचा मागोवा देखील ठेवू शकतात. वापरकर्ते त्यांच्या फोन किंवा लॅपटॉपवरुन त्यांच्या वॉचलिस्टमध्ये गूगलसर्चद्वारे देखील जोडू शकतात आणि सर्व काही एकाच ठिकाणी शोधू शकतात. ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) अॅपल एयरप्ले 2 (Apple Airplay2) आणि अॅपल होमकिट (HomeKit) ला देखील पूरक असल्याने सहजतेने कंटेंट प्रदर्शित व्हावे यासाठी ते टीव्हीसोबत आयपॅड आणि आयफोन्स सारख्या अॅपल च्या उपकरणांना अखंडपणे व सहज समाकलीत करते.
हॅंड्स फ्री वॉइस सर्च वैशिष्ठ्याने तुम्ही तुमचे आवडते कार्यक्रम आणि चित्रपट लावण्यासाठी टीव्ही बरोबर संवाद साधू शकता.
हॅंड्स फ्री वॉइस सर्च वैशिष्ठ्याने तुम्ही तुमचे आवडते कन्टेंट पूर्वीपेक्षा अधिक लौकर शोधा. यामध्ये कठीण व किचकट नॅव्हिगेशन नाही किंवा कंटाळवाणे टायपिंग करावे लागत नाही. यामध्ये तुम्ही केवळ विचारले पाहिजे. टेलिव्हिजनमधील अंतर्भूत मायक्रोफोन्स दर्शकांना सोईस्कर आणि खरोखर हॅंड्स फ्री अनुभव देतात. प्रेक्षक त्यांना काय हवे ते पटकन शोधण्यासाठी किंवा टीव्ही शो, चित्रपट व असे बरेच काही चालू करण्यासाठी रिमोट न वापरता केवळ गूगल असिस्टंट वापरुन टीव्हीबरोबर बोलू शकतात.
नवीन X82L टीव्ही मालिका आता आयमॅक्स (IMAX) वर्धित चित्रपटांच्या सर्वात मोठ्या संग्रहाचा आणि उच्चतम गुणवत्तेच्या प्यूअर स्ट्रीमTM 80 एमबीपीएससह (Pure Stream™ 80mbps) डॉल्बी अॅटमॉस सामग्रीचा आनंद घेण्यासाठी ब्रॅव्हिआ कोअर अॅप (BRAVIA CORE app) सह येत आहे.
ब्रॅव्हिआ कोअर अॅप (BRAVIA CORE app) एक प्री-लोड केलेली मूव्ही सेवा आहे जी बाराही महिने प्रसिद्ध चित्रपटांच्या अमर्यादित पर्यायांसह नवीन प्रदर्शित झालेले चित्रपट व क्लासिक ब्लॉकबस्टर चित्रपटांसाठी 5 क्रेडिट्सची पूर्तता करण्यास अनुमति देते. 4K ब्ल्यू रे तंत्रज्ञानामध्ये प्रक्षेपित करण्यासाठी उपलब्ध असलेल्या सोनी पिक्चरच्या मोठ्या चित्रपट लायब्रेरीमध्ये ही मालिका प्रवेश देते. ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) मध्ये प्यूअर स्ट्रीमTM च्या माध्यमातून उच्चतम गुणवत्तेची प्रक्षेपण पिक्चर गुणवत्ता आणि डॉल्बी अॅटमॉससोबत आयमॅक्स (IMAX) वर्धित चित्रपटांच्या सर्वात मोठ्या संग्रहाची उपलब्धता यांच्यासह तुम्ही जे काही पाहता ते आश्चर्यकारक दृश्य आणि अभिव्यक्त आवाज गुणवत्तेसह वितरित केले जाते. ब्रॅव्हिआ कोअर कॅलिब्रेटेड मोड (BRAVIA CORE Calibrated mode) ने खरोखरच चित्रपट पाहण्याचा अनोखा अनुभव तयार करण्यासाठी तुमचा चित्रपट इष्टतम चित्र सेटिंग्जमध्ये आपोआप समायोजित होईल.
ब्रॅव्हिया एक्स८२एल (BRAVIA X82L) मधील गेम मेन्यू वैशिष्ठ्य तुम्हाला गेमिंगची स्थिती, सेटिंग्ज आणि गेमिंग सहाय्य कार्ये हे सर्व एकाच ठिकाणी सहजपणे उपलब्ध करून देते
एक्स८२एल (X82L) मालिकेत वापरण्यास सोपा गेम मेन्यू समाविष्ट आहे, जेथे खेळाडू सेटिंग्ज त्याच्या प्राधान्यांनुसार सानुकूलित करू शकतो, जसे की व्हिआरआर चालू किंवा बंद करणे किंवा द्रुत प्रवेशासह मोशन ब्लर रिडक्शन. गेम मेन्यू वापरकर्त्यांना ब्लॅक इक्विलायझरसह वस्तू आणि विरोधकांना सहजपणे शोधण्यासाठी गडद भागात उजेड वाढवण्याचा पर्याय देतो आणि सहा प्रकारच्या क्रॉसहेअरसह त्यांच्या विरोधकांवर सहजपणे लक्ष्य करू शकतो. लहान, फोकस केलेल्या स्क्रीन सह गेमिंग एकाग्र करण्यासाठी तुम्ही स्क्रीन साइज वैशिष्ठ्याच्या मदतीने स्क्रीनचा आकार सानुकूल करू शकता.

किंमत आणि उपलब्धता:
मॉडेल
किंमत
उपलब्ध होण्याची तारीख

KD-55X82L
९१,९९०/-
२ जून २०२३ पासून

KD-65X82L
१२४,९९०/-
२ जून २०२३ पासून

KD-75X82L
लौकरच जाहीर होईल
लौकरच जाहीर होईल

हे मॉडेल्स भारतातील सर्व प्रमुख सोनी केंद्रे, प्रमुख इलेक्ट्रॉनिक दुकाने आणि भारतातील ई कॉमर्स पोर्टलवर उपलब्ध असतील.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें