थिवि वाताहार

गणेशपुरी म्हापसा येथील प्रगत ललना महिला मंडळ आयोजित गणेश विद्यामंदीर हायस्कूल मध्ये नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. या नेत्र शिबीराचे उदघाटन गणेश मंदिर देवस्थान अध्यक्ष सत्यवान भिवशेट, गणेश विद्यामंदीर हायस्कूल चे उपाध्यक्ष दिलीप महाले, प्राध्यापिका सुवर्णा कामत यांच्या हस्ते करण्यात आले नेत्रतज्ज्ञ. डॉ. अरुण पाटील ( मुंबई) तसेच नेत्रतज्ज्ञ डॉ. रोहित श्री वास्तव ( पुणे) यांनी तपासणी केली. या शिबीरचा लाभ ४५० लोकांनी घेतला. शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रगत ललना महिला मंडळ अध्यक्षा रुपाली गवंडळकर,सचिव पुनम गोवेकर, कोषाध्यक्ष शयन वाळके व इतर सदस्यांनी सहकार्य केले.