पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदि

.

म्हापसा वाताहार

पद्मश्री पुरस्काराने सन्मानित मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदि ही चित्रपट सृष्टीला लागलेली महान देणगी होती, तिने अनेक मराठी व हिंदी चित्रपटामध्ये’ आई’ची भुमिका फार यथोचित पणे साकारून आईची वात्सल्यमूती तळागाळात पोचवली असे उदगार समाजोन्नती संघटनेच्या मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष तथा नाट्य कलाकार शंभू भाऊ बांदेकर यांनी म्हापसा येथे काढले. सुलोचना लाटकर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी नुकतेच निधन झाले त्याना आदरांजली वाहण्यासाठी संघटनेच्या कला विभागातफै आयोजित क्षदांजली सभेत बांदेकर बोलत होते. कार्यक्रमाचा अध्यक्ष स्थानी कला विभागाचे अध्यक्ष व नाट्यकर्मी महेश चव्हाण होते. सर्व प्रथम संघटनेचे सचिव राजेश चव्हाण यांनी प्रास्ताविक करून सभेचा उदेश्य सांगितला त्यानंतर संघटनेचे सरचिटणीस व नाट्यकर्मी आणि उपाध्यक्ष आणि कला विभागाचे धृव कुडाळकर, दामोदर कुडाळकर आणि महेश चव्हाण यांनी सुलोचना दिदि च्या एकुण चित्रपट सृष्टीतील समयोचित भाषणे झाली. यावेळी चंद्र मोहन आलैकर उपस्थित होते संघटनेचे पेडणे तालुका अध्यक्ष विशांत कोरगांवकर यांनी ऋणनिदैश केला. शेवटी एक मिनीट उभे राहून मृत आत्मा स चिरशांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. फोटो भारत बेतकेकर
बैठकीत उपस्थित शंभू भाऊ बांदेकर, धृव कुडाळकर. दामोदर कुडाळकर. विशांत कोरगांवकर व इतर

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें