स्‍कोडा ऑटो इंडियाकडून डिलिव्‍हरी वेळ वेगवान करण्‍यासाठी प्रमुख कोडियानच्‍या पुरवठ्यामध्‍ये अधिक वाढ

.

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून डिलिव्‍हरी वेळ वेगवान करण्‍यासाठी प्रमुख कोडियानच्‍या पुरवठ्यामध्‍ये अधिक वाढ
२०२३ कोडियाक लाँच केल्‍यानंतर लवकरच स्‍कोडा ऑटो इंडियाने भारतासाठी लक्‍झरी ४x४ एसयूव्‍हीच्‍या अतिरिक्‍त वाटपाची घोषणा केली आहे, ज्‍यामुळे ग्राहकांना जलदपणे डिलिव्‍हरी करता येईल. नवीन कोडियाक प्रथम २०२२ मध्‍ये लाँच करण्‍यात आली. पण वर्षासाठी वाटप करण्‍यात आलेल्‍या सर्व कार्सची विक्री काही आठवड्यांमध्‍येच झाली. वाढत्‍या मागणीला उत्तम प्रतिसाद देत कंपनीने भारतात २०२३ साठी पुरवठ्यांमध्‍ये अधिक वाढ केली आहे. भारत स्‍कोडा ऑटोसाठी तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ आणि जर्मनी व झेक रिपब्लिकनंतर युरोपबाहेरील सर्वात मोठा देश आहे.
२०२३ साठी नवीन
स्‍कोडा कोडियाकमध्‍ये २.० टीएसआय ईव्‍हीओ इंजिनची शक्‍ती आहे, जे नवीन उत्‍सर्जन नियमांची पूर्तता करते. मोटर पूर्वीपेक्षा आता ४.२ टक्‍के अधिक कार्यक्षम आहे. लक्‍झरी ४x४ एसयूव्‍ही १४० केडब्‍ल्‍यू (१९० पीएस) शक्‍ती आणि ३२० एनएम टॉर्क देते, ज्‍यामुळे फक्‍त ७.८ सेकंदांमध्‍ये ० ते १०० किमी/तास गती प्राप्‍त करते (दावा केलेली आकडेवारी). स्‍कोडा ब्रॅण्‍डच्‍या सिम्‍प्‍ली क्‍लेव्‍हर वैशिष्‍ट्यांच्‍या श्रेणीमध्‍ये आणखी एका नवीन वैशिष्‍ट्याची भर करण्‍यात आली आहे – डोअर-एज प्रोटेक्‍टर्स. दरवाजे उघडताना आपोआपपणे उघडले जातात, ज्‍यामुळे दरवाजावरील कडांचे डेंट्स व स्‍क्रॅचेसपासून संरक्षण होते. रिअर स्‍पॉइलरमध्‍ये एअरफ्लोची भर करण्‍यासाठी आणि या लक्‍झरी ४x४ एसूयव्‍हीची एरोडायनॅमिक्‍स सुधारण्‍यासाठी अतिरिक्‍त फिनलेट्सचा समावेश करण्‍यात आला आहे. आतील बाजूस मागील आसनांवरील प्रवाशांना त्‍यांच्‍या पायांना आराम मिळण्‍याकरिता लाऊंज स्‍टेप आणि दुसऱ्या आसन रांगेत आऊटर हेडरेस्‍ट्स आहे, ज्‍यामुळे कुटुंबासाठी या ४x४ मध्‍ये लक्‍झरी व आरामदायीपणा दर्जा अधिक वाढतो.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें