अॅक्सिस बँकेतर्फे सांखळी, गोवा येथे स्वच्छता मोहिमेचे आयोज
न
गोवा, ९ जून २०२३ – जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी अॅक्सिस बँक या भारतातील खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने सांखळी, गोवा येथे क्लीन-ए-थॉन या स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. हा उपक्रम कंपनीने देशभरातील २५ पेक्षा जास्त समुद्रकिनारे व पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करण्यासाठी हाती घेतलेल्या राष्ट्रीय मोहिमेचाच एक भाग आहे. या कॅम्पेनमध्ये १७० पेक्षा जास्त स्वयंसेवकांनी सहभागी होत प्लॅस्टिक प्रदुषणावर तातडीने आळा घालण्याची आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची गरज असल्याकडे लक्ष वेधले. गोव्याचे माननीय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्डाचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप सरमोकदम, मनपा कौन्सिलच्या अध्यक्ष श्रीमती रश्मी देसाई हे मान्यवर यावेळी उपस्थित होते.
या स्वच्छता मोहिमेत बँकेच्या शाखांचे कर्मचारी, स्थानिक समाज, पर्यावरणीय कार्यकर्ते/इन्फ्लुएन्सर्स, स्थानिक प्रशासन व स्वयसेवकांनी सहभागी होत समुद्रकिनारे आणि जलाशयांमधून ११० किलो प्लॅस्टिकचा कचरा उचलला. स्वयंसेवकांनी स्थानिकांना प्लॅस्टिक प्रदुषणाच्या घातक परिणामांची माहिती देत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यास सांगितले.
या उपक्रमाविषयी अॅक्सिस बँकेच्या ब्रँच बँकिंग रिटेल लायबिलिटीज अँड प्रॉडक्ट्स व विभागाचे समूह एक्झक्युटिव्ह श्री. रवी नारायणन म्हणाले, ‘पृथ्वीचे रक्षण करण्याची जबाबदारी आपल्य सर्वांवर आहे आणि या उपक्रमाच्या मदतीने आम्ही नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे ध्येय ठेवले आहे. या उपक्रमामुळे अधिक हरित व शाश्वत भविष्य घडवण्याच्या जागतिक प्रयत्नांना हातभार लागेल. त्याचप्रमाणे यातून भावी पिढ्यांसाठी सुरक्षित व निरोगी पृथ्वी तयार करण्यासाठीची आमची बांधिलकी नव्याने अधोरेखित झाली आहे.’
बँकेतर्फे ४ ते ११ जून २०२३ दरम्यान २० शहरांत हे कॅम्पेन राबवले जाणार असून त्यात मुंबई, बेंगळुरू, कोची, चेन्नई, हैद्राबाद, वाराणसी, पटना या शहरांचा समावेश आहे. हा उपक्रम संयुक्त राष्ट्रांनी जागतिक पर्यावरण दिन २०२३ निमित्त ठेवलेल्या ‘#BeatPlasticPollution’ या थीमशी सुसंगत आहे.
जागतिक पर्यावरण दिन २०२३ च्या उपक्रमातील अॅक्सिस बँकेचा सहभाग शाश्वत विकासाप्रती असलेली कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी निभावण्याची बांधिलकी दर्शवणारा आहे. प्लॅस्टिक प्रदुषणामुळे तयार होणाऱ्या पर्यावरणीय आव्हानांविषयी जागरूकता निर्माण करण्याची तसेच पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याचे महत्त्व यांची बँकेला सखोल जाण आहे.
About Axis Bank:
Axis Bank is one of the largest private sector banks in India. Axis Bank offers the entire spectrum of services to customer segments covering Large and Mid-Corporates, SME, Agriculture, and Retail Businesses. With its 4,903 domestic branches (including extension counters) and 15,953 ATMs across the country as on 31st March 2023, the network of Axis Bank spreads across 2,741 cities and towns, enabling the Bank to reach out to a large cross-section of customers with an array of products and services. The Axis Group includes Axis Mutual Fund, Axis Securities Ltd., Axis Finance, Axis Trustee, Axis Capital, A.TReDS Ltd., Freecharge, Axis Pension Fund, and Axis Bank Foundation.
For further information on Axis Bank, please refer to the website: https://www.axisbank.com
Media contact:
Axis Bank
Adfactors PR
Piyali Reddy
+91 9322657983
piyali.reddy@axisbank.com
Shruti Mudup
+91 9820651056
Shruti.Mudup@axisbank.com
Janki Telivala
+ 91 9892623468
janki.telivala@adfactorspr.com
Sreshta Bhattacharya
+91 7030200118
sreshta.bhattacharya@adfactorspr.com