रूमडामळ, मडगाव येथील पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावरील आक्रमणाचा हिंदु जनजागृती समितीकडून निषेध

.

 

दिनांक : १९.०६.२०२३

*रूमडामळ, मडगाव येथील पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावरील आक्रमणाचा हिंदु जनजागृती समितीकडून निषेध*

_अनधिकृत मदरशावर कारवाई करण्याची मागणी_
मडगाव, १९ जून – रूमडामळ, दवर्ली पंचायतीचे माजी सरपंच आणि विद्यमान पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर १७ जूनच्या रात्री झालेल्या प्राणघातक आक्रमणाचा हिंदु जनजागृती समिती तीव्र शब्दात निषेध करते. पंचसदस्य विनायक वळवईकर प्रसंगावधान राहिल्याने या हल्ल्यातून वाचले. ही घटना गंभीर असल्याचे आणि दोषीवर कारवाई करणार असल्याचे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. या प्रकरणी दोषीवर कठोर कारवाई होईल, अशी अपेक्षा बाळगतो. तसेच रूमडामळ येथील अनधिकृत मदरशाच्या विरोधात आवाज उठवल्याने पंचसदस्य विनायक वळवईकर यांच्यावर कारवाई झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. रूमडामळ पंचायत आणि शासनाने अनधिकृत मदरशावर कठोर कारवाई करून ‘यापुढे असा प्रकार खपवून घेणार नाही’, असा संदेश सर्वत्र द्यावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केले आहे.

आपला नम्र,
*डॉ. मनोज सोलंकी,*
राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
(संपर्क क्रमांक : ९३२६१०३२७८)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें