रुमडामळ( मडगाव)चे माजी सरपंच/विद्यमान पंच विनायक वळवईकर यांच्यावरील खुनी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई

.

मडगाव वाताहार
रुमडामळ( मडगाव)चे माजी सरपंच/विद्यमान पंच विनायक वळवईकर यांच्यावरील खुनी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करत असल्याचे राष्ट्रीय बजरंग दलाचे गोवा विभाग प्रमुख नितीन फळदेसाई यांनी म्हटले आहे.

विनायक दळवईकर यांनी अलिकडेच, संशयास्पद मदरशाला विरोध केला होता. सध्या रूमडामळ पंचायत “पाॅप्युलर फ्रंट ऑफ इंडिया”( PFI) ,या भारत सरकारने बंदी घातलेल्या जिहादी आतंकवादी संघटनेच्या वर्चस्वाखाली आहे. ही गोष्ट येथे प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी.

रुमडामळ येथे जात्यंधांच्या आक्षेपार्ह कारवाया वाढल्या आहेत, सरकारने या ठिकाणी गंभीरपणे लक्ष पुरवायला हवे. ‘रुमडामळ’ हा मडगावच्या छातीवर टिकटिकणारा हिंसक सशस्त्र दंगलींचा टाईमबाॅम्ब आहे, याची दखल जशी सरकारने घेतली पाहिजे, तशीच प्रत्येक हिंदूने ही याबाबत जागरूक राहायला हवे, असेही फळदेसाई यांनी म्हटले आहे.

विनायक दळवईकर यांना शासनाने त्वरित सुरक्षा पुरवायला हवी, तसेच या प्रकरणातील आरोपींना अट करून त्यांना शिक्षा होईल याचे नियोजनही सरकारने करायला हवे, असेही फळदेसाई शेवटी म्हणाले.

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें