होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने लाँच केली ओबीडी२ चे पालन करणारी 2023 शाइन 125 ‘अमेझिंग शाइन’

.

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने लाँच केली ओबीडी२ चे पालन करणारी
2023 शाइन 125 ‘अमेझिंग शाइन’

अत्याधुनिक तंत्रज्ञान
१२५ सीसी बीएसव्हीआय ओबीडी2 चे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन ईएसपीसह (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर)
पेटंटेड एसीजी स्टार्टर मोटरमुळे दरवेळेस जलद, आवाजमुक्त, झटका न देता सुरू होते

आरामदायी व सोयीस्कर
५- स्पीड ट्रान्समिशनमुळे प्रभावी आणि सफाईदार प्रवास
उच्च ग्राउंड क्लियरन्स (१६२ एमएम) आणि लांब व्हीलबेसमुळे (१२८५ एमएम) राइड सुखकर
लांबलचक सीट (६५१ एमएम) रायडर आणि पिलियनसाठी सोयीस्कर
डीसी हेडलॅम्पमुळे कमी वेग आणि रात्रीच्या प्रवासासाठी अखंड प्रकाश
इंजिन स्टार्ट/स्टॉप – एकाच स्विचवर इंजिन चालू- बंद करण्याची सोय
दर्जेदार ट्युबलेस टायर्समुळे पंक्चर झाल्यास लगेच हवा कमी होत नाही.
हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विच एकत्रित असल्यामुळे दोन्ही कामे सोपी

भव्य आणि स्टायलिश
ठळक फ्रंट व्हायजर, क्रोम गार्निश, प्रीमियम क्रोम साइड कव्हर्स, लक्षणीय ग्राफिक्स आणि आकर्षक क्रोम मफलर कव्हरमुळे गाडीचे रूप आणखी उठावदार
साधे तरीही अभिरूचीपूर्ण मीटर डिझाइन, स्मार्ट टेल लॅम्प आणि ट्रेंडी ब्लॅक अलॉय यामुळे गाडी इतरांपेक्षा वेगळी उठून दिसते

ग्राहकांसाठी सर्वार्थाने फायदेशीर
ग्राहकांसाठी नवे मूल्य देणारे पॅकेज
दहा वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज
2023 शाइन दोन प्रकारांत उपलब्ध – ड्रम आणि डिस्क
आकर्षक किंमत रू. ७९,८०० पासून सुरू (एक्स शोरूम दिल्ली)

नवी दिल्ली, १४ जून २०२३ – होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि. ने आज नवी, ओबीडी२ चे पालन करणारी ओबीडी२ चे पालन करणारी नवी 2023 शाइन 125 लाँच केली. नव्या शाइन 125 ची किंमत ७९,८०० पासून सुरू (एक्स शोरूम दिल्ली) आहे.

ओबीडी२ सुसंगत नवी 2023 शाइन 125 लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाचे अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. त्सुत्सुमु ओतानी म्हणाले, ‘१२५ सीसी मोटरसायकल विभागात शाइन ब्रँडने मिळवलेले यश ग्राहकांचा विश्वास आणि प्रेम दर्शवणारे आहे. 2023 शाइन 125 लाँच करताना आम्हाला खात्री आहे, की ही गाडी नवा मापदंड प्रस्थापित करेल व आमचे बाजारपेठेतील स्थान आणखी बळकट करेल.’

ओबीडी२ चे पालन करणारी नवी 2023 शाइन 125 लाँच करताना होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाच्या विक्री आणि विपणन विभागाचे श्री. योगेश माथुर म्हणाले, ‘शाइन ब्रँडने सुरुवातीपासूनच ग्राहकांचा विश्वास मिळवला आहे. होंडाचे दर्जेदार तंत्रज्ञान, आधुनिक वैशिष्ट्ये आणि वॉरंटीचे १० वर्षांचे खास पॅकेज यांमुळे शाइन ग्राहकांना त्यांच्या पैशांचे पुरेपूर मूल्य आणि मनःशांतीही देते.’

अत्याधुनिक तंत्रज्ञान
2023 शाइन 125 मध्ये १२५ सीसी बीएसव्हीआय ओबीडी2 चे पालन करणारे पीजीएम- एफआय इंजिन ईएसपीसह (एनहान्स्ड स्मार्ट पॉवर) बसवण्यात आले आहे. एनहान्स्ड स्मार्ट पॉवरमध्ये (ईएसपी) पुढील गोष्टींचा समावेश आहे.
अनोखे होंडा एससीजी स्टार्टर – करंटनिर्मिती करण्यासाटी आणि बॅटरी चार्ज करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एसी जनरेटरद्वारेच इंजिन झटक्याशिवाय सुरू होते. यामुळे नेहमीच्या स्टार्टर मोटरची गरज पडत नाही. यामुळे गियर मेशिंगचा आवाजही येत नाही.

दोन मेकॅनिकल वैशिष्ट्यांमुळे कमी प्रयत्नांत इंजिन सुरू होते – यातले पहिले म्हणजे डीकंप्रेशनचा कार्यक्षम वापर आणि किंचित उघडलेले एक्झॉस्ट व्हॉल्व्हज (कंप्रेशन स्ट्रोकच्या सुरुवातीला दिलेले) आणि त्यानंतर स्विंग बॅक सुविधा, ज्यामुळे इंजिन जरासे विरूद्ध दिशेला फिरते व त्यामुळे पिस्टनला ‘रनिंग स्टार्ट’ मिळतो. पर्यायाने कमीत कमी उर्जेच्या वापराने इंजिन सुरू होते.

प्रोग्रॅम्ड फ्युएल इंजेक्शन (पीजीएम- एफआय): सिस्टीम ऑनबोर्ड सेन्सर्सचा वापर करून योग्य प्रमाणात इंधन आणि हवेचे मिश्रण भरते, ज्यामुळे उर्जेचा सातत्यपूर्ण पुरवठा, उच्च इंधन कार्यक्षमता आणि कमी उत्सर्जन शक्य होते.

कमी घर्षण – पिस्टन कूलिंग जेटमुळे घर्षण कमी होते व इंजिनचे तापमान योग्य राखले जाते. ऑफसेट सिलेंडर आणि रॉकर रोलर आर्मच्या वापरामुळे घर्षणातून होणारे नुकसान कमी होते. यामुळे जास्त चांगली व एकसलग उर्जा मिळते, शिवाय इंधन कार्यक्षमता उंचावते.

आरामदायी आणि सोयीस्कर
नव्या शाइन 125 मध्ये ५ स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे, ज्यामुळे प्रवास सुखकर होतो. डीसी हेडलॅम्पमुळे प्रखर आणि एकसलग प्रकाश मिळतो. पर्यायाने खराब किंवा रात्रीच्या वेळेस कमी उजेड असलेल्या रस्त्यांवर गाडी सुरक्षितपणे चालवता येते.

इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच दुहेरी पद्धतीने वापरता येतो. म्हणजेच खालच्या बाजूला दाबल्यानंतर इंजिन सुरू होते आणि वरच्या बाजूला दाबल्यानंतर इंजिन बंद होते. इंटिग्रेटेड हेडलॅम्प बीम आणि पासिंग स्विचमुळे एकाच स्विचवर हाय आणि लो बीम नियंत्रित करता येते.

५ स्टेप अडजस्टेबल रियर सस्पेन्शन रस्त्याच्या परिस्थितीनुसार हव्या त्या पद्धतीने अडजस्ट करून प्रवास आरामदायी करता येतो. त्यामध्ये सील चेन देण्यात आली असून त्यामुळे वारंवार अडजस्ट करण्याची, देखभाल करण्याची गरज भासत नाही. शाइन 125 ची प्रत्येक राइड आरामदायी व सोयीस्कर करण्यासाठी त्यात कॉम्बी- ब्रेक सिस्टीम (सीबीएस) इक्विलायझरसह देण्यात आली आहे.

१६२ एमएमच्या हाय ग्राउंड क्लियरन्समुळे रायडरला निश्चिंतपणे आणि आरामात गाडी चालवता येते. १२८५ एमएमच्या लाँग व्हीलबेसमुळे एकंदर स्थैर्य आणि समतोल राखण्यास मदत होते. ६५१ ची लांब सीट इंधनाच्या टाकीसह देण्यात आली असून त्यामुळे मोठा प्रवासही अगदी आरामात करता येतो.

इंधनाच्या टाकीच्या बाहेरच्या बाजूस बसवण्यात आलेल्या बाह्य फ्युएल पंपमुळे देखभालीसाठी लागणारा वेळ कमी होतो. शाइन 125 मध्ये दर्जेदार, ट्यूबलेस टायर्स देण्यात आले आहेत, ज्यामुळे पंक्चर झाल्यावरही हवा लगेच कमी होत नाही.

भव्य आणि स्टायलिश
नवी शाइन १२५ रायडरला प्रवासाचा पूर्ण आनंद देते. ठळक फ्रंट व्हायजर, क्रोम गार्निश, प्रीमियम क्रोम साइड कव्हर्स, लक्षणीय ग्राफिक्स आणि आकर्षक क्रोम मफलर कव्हरमुळे गाडीचे रूप आणखी उठावदार झाले आहे. साधे तरीही अभिरूचीपूर्ण मीटर डिझाइन, स्मार्ट टेल लॅम्प आणि ट्रेंडी ब्लॅक अलॉय यामुळे गाडी इतरांपेक्षा वेगळी उठून दिसते.

एचएमएसआयतर्फे १० वर्षांचे खास वॉरंटी पॅकेज देण्यात आले आहे (३ वर्ष स्टँडर्ड + ७ वर्षांची पर्यायी विस्तारित वॉरंटी) 2023 शाइन 125 वर देण्यात येणार आहे.

2023 शाइन 125 व्हेरिएंट्स,
किंमत आणि रंग

व्हेरिएंट
ड्रम
डिस्क

किंमत
(एक्स शोरूम दिल्ली)
रू. ७९,८००
रू. ८३,८००

रंगांचे पर्याय
काळा, जिनी ग्रे मेटॅलिक, मॅट अक्सिस ग्रे, रेबल रेड मेटॅलिक, डिसेंट ब्लू मेटॅलिक

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें