थिवि वाताहार
जायंट्स गृप ऑफ सहेली पर्वरी तफै संस्थापक नाना चुडासमा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जायंट्स गृप ऑफ पर्वरी सहेली
तफै राम वडेश्वर मंदिर पर्वरी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी फेडरेशन दहा चे अध्यक्ष उमेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सचिव विठ्ठल पासैकर यावेळी उपस्थित होते. सहेली पर्वरी च्या अध्यक्षा विधीती धुरी यांनी यावेळी वृक्षाचे महत्त्व सांगितले. तसेच यावेळी रोपटी वाटप करण्यात आले. सुमित्रा नाईक यांनी आभार मानले.