करमल घाटातील धोकादायक मार्गाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज : युवा काँग्रेस

.

करमल घाटातील धोकादायक मार्गाकडे तातडीने लक्ष देण्याची गरज : युवा काँग्रेस

पणजी : सोमवारी करमल घाटात झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि बाकीचे चार गंभीर जखमी झाले, युवा काँग्रेसने समाज मध्यामांवरील पोस्टद्वारे पुन्हा एकदा तेथील धोकादायक वळणाकडे लक्ष देण्याचा मुद्दा ठळकपणे समोर आणला आहे.
महाराष्ट्रातील एक गट रेंट अ कारद्वारे तेथून प्रवास करतात. काणकोणातील करमल घाटात यापूर्वीही अनेक अपघात झालेले आहेत आणि तीन दिवसांपूर्वी युवा काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी हा विषय सरकारच्या नजरेस आणून तिथे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली होती. अनेक स्थानिक संस्थांनी आणि काँग्रेसनेही ही समस्या सोडविण्याची मागणी केली होती, पण आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही, युवा काँग्रेस पुढाऱ्यांनी हा मुद्दा ठळकपणे समोर आणला आहे.
“सबका साथ, सबका विकास, हर घर जल अशाप्रकारची घोषणाबाजी भाजपा करत असते. मात्र लोक मरत आहेत, लोकांनी विकास, खासकरून चांगले रस्ते मिळेल या आशेने भाजपाला मतदान केले होते. या अपघातप्रवण क्षेत्राला कित्येक महिने झाले कुंपण घातलेले नाही. पीडब्ल्यूडीने मोडलेल्या कुंपणाचे दुरुस्तीकाम करण्यासाठी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. “आम्ही मागतो की सरकारने तातडीने करमल घाटातील धोकादायक वळणाच्या बाबतीत उपाययोजना करावी,” गोवा प्रदेश युवा काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष, वैष्णव पेडणेकर म्हणाले.
दक्षिण गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे महासचिव, गॅस्पर कुतिन्हो आणि जीपीवायसीचे कार्यधिकारी, वैशाल पागीसुद्धा काणकोणातील या धोकादायक मार्गाचा व्हिडियो हायलायट करताना बरोबर होते.

 

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें