गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात नववा आंतरराष्ट्रीय योगदिन

.
म्हापसा वाताहार
गणेशपुरी, म्हापसा येथील ‘विद्या भारती’ संचालित श्रीगणेश उच्च माध्यमिक विद्यालयात नववा आंतरराष्ट्रीय योगदिन विद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग व कुंडई येथील श्रीदत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज,गणेशपुरी,खोर्ली,काणका (म्हापसा) यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला.
योगशिक्षक सुजन नाईक व संजय मडगांवकर यानी बारावीच्या विद्यार्थ्यांना, तसेच आचार्य वर्गाला विविध प्रकारची योगासने व महत्वाचे प्राणायाम शिकवले.दिलीप गडेकर यानी शीर्षासनाचे प्रात्यक्षिक केले.अकरावीच्या विद्यार्थ्यांनी शारीरिक शिक्षक अभय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपुरी मैदानावर योगासने केली.
गोवा विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दिलीप महाले व विद्यालयाचे प्राचार्य गजानन मांद्रेकर यानी दीपप्रज्वलन करून योगदिनाचे उद्घाटन केले.
विद्यालयाचे आचार्य नारायण गांवस यानी मान्यवरांचे स्वागत केले.संतसमाजाचे अध्यक्ष राजेंद्र धारगळकर यानी प्रास्ताविक केले.तुषार नाईक व विठ्ठल पालयेकर हे संतसमाजाचे कार्यकर्ते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
तत्पूर्वी सर्व विद्यार्थ्यांनी योगदिनाची शपथ घेतली.योग विषयावर प्रश्नमंजुषाही घेण्यात आली.प्रविता नाईक यानी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.विद्यालयाच्या समुपदेशक आश्विनी बांदेकर यानी ऋणनिर्देश केला.
(छायाचित्र: श्रीगणेश उच्च विद्यालयात योगदिनी प्रात्यक्षिके करताना विद्यार्थी.)

[ays_slider id=1]

इसे भी पढे ----

वोट जरूर करें

गोव्यामध्ये कोणता पक्ष विजयी होणार ?

View Results

Loading ... Loading ...

आज का राशिफल देखें