थिवि नवा
योग हा केवळ एका धर्मासाठी नसून सर्व धर्मासाठी आहे योग म्हणजे शरीराला योग्य बनवणे चंचल मन स्थिर करणे वाईट व नकारार्थी विचार दूर करणे हे योगातून साध्य होऊ शकते
.तसेच विविध योगासनामुळे सध्याच्या युगात प्रचलित झालेले रोग आपण योगाद्वारे दूर करू शकतो त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन गोळ्यां न खाता आपणच आपले योग डॉक्टर बनून आपले शरीर सुदृढ ,निरोगी व निर्गुण दीर्घ आयुष्य बनवू शकतो असे प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत असताना श्री भगवती हायस्कूलचे पेडण्याचे मुख्याध्यापक श्री केशव पणशीकर यांनी प्रतिपादन केले.


वळपे पेडणे येथील विकास हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग्य दिन नुकताच साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम वीरनोडा ग्रामपंचायतच्या सभागृहात आयोजित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर विरनोडा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुजाता ठाकूर हायस्कूलचे ,मुख्याध्यापक नागेश गोसावी ,शाळा व्यवस्थापक कमिटीचे अध्यक्ष प्रदीप परब तसेच पंच सदस्य उपस्थित होते यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले
कुमार आदेश सातावळेकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर मुख्याध्यापक नागेश गोसावी याने मान्यवरांचा परिचय करून दिला
श्री केशव पणशीकर व सोबत विद्यार्थी अनन्या मालपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूलच्या मुलांनी विविध योगासने केली संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पलक रीकरमळकर यांनी केले