“आजच्या पिढीला ,आध्यात्म , देवाची गोडी तसेच आपल्या संस्कृतीची जाण असावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन सगळ्या शाळेत होणे गरजेचे आहे .” असे उदगार श्री. शशिकांत नाईक गावकर यांनी गोवा विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली, यांनी बरवनवाडा कामुर्ली येथे,श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीचे आयोजित केले तेव्हा ते म्हणाले. यानिमित्त पीपल्स हायस्कूल कामुर्ली ते विठ्ठल रखुमाई मंदिर पर्यंत ,विद्यार्थी,शिक्षक तसेच पालकांनी टाळ मृदंगाच्या गजरात दिंडी यात्रा केली . तसेच सातेरी प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक नृत्य सादर केले. व पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून विठ्ठल भजन ,अभंग सादर केलेत. यावेळी शाळेच्या शिक्षिका कु. पूजा शेट्ये यांनी आषाढी एकादशीचे महत्व उपस्थिताना सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्या बरोबर व्यासपीठावर विठ्ठल रखुमाई मंदिर कमिटीचे सदस्य श्री.चंद्रहास चोडणकर ,सातेरी प्राथमिक विद्यालयाचे पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय श्री. महेंद्र नाईक ,सातेरी प्राथमिक विद्यालयाचे व्यवस्थापक माननीय श्री.राजेंद्र जोशी व शाळेचे मुख्याध्यापक श्री संदीप पाळणी उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.मयुरी पाटील यानी केले . तर पाहुण्यांची ओळख सौ. करिष्मा वायगणकर यांनी केले ,आणि सौ. शांती नाईक गावकर यांनी ऋणनिर्देशन केले . संपूर्ण कार्यक्रम सौ.शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. शेवटी शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली.
आजच्या पिढीला ,आध्यात्म , देवाची गोडी तसेच आपल्या संस्कृतीची जाण असावी

.
[ays_slider id=1]