म्हापसा वाताहार
जीवनात यश मिळवण्यासाठी तुमच्या कामाकडे आशावादी दृष्टिकोन असायला हवा तसेच तुमच्या कामात सातत्य येण्यासाठी नम्रता असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माननीय श्री. जयेश नीलकंठ थळी यांनी गोवा,विद्याभारती संचालित पीपल्स हायस्कूल कामुर्ली येथे विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली त्यावेळी केले . कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. शाळेचे शिक्षक श्री महेंद्र परब यांनी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या पीपल्स हायस्कूलच्या विद्यार्थी परिषद समितीच्या नावाची घोषणा केली. शाळेच्या जनरल सेक्रेटरी ची निवड मतदान पध्दतीने करण्यात आली. यावेळी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या मतदानाचा हक्क बजावला.पाहुण्यांच्या हस्ते सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
संपूर्ण विद्यार्थी परिषदेने मुख्याध्यापक श्री संदीप पाळणी व माननीय पाहुणे श्री जयेश थळी यांच्या समक्ष शाळेच्या कामकाजाची जबाबदारी पार पाडण्याची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यासाठी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.खालीलप्रमाणे विद्यार्थी परिषदेचे खाते वाटप करण्यात आले.
१. शाळेच्या सरचिटणीस कु सलोनी गवाळकर
२. शिस्त प्रभारी कु.सितेज नाईक
३. आरोग्य व स्वच्छता प्रभारी कु. महादेव मराठे
४. सांस्कृतिक प्रभारी कु.प्रिया मल्ला
५. क्रीडा प्रभारी कु.राजीव घारसे मुख्याध्यापकांनी प्रत्येक सदस्याची भूमिका व कर्तव्य सांगितली .
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.स्नेहा मठकर यांनी केले. तर पाहुण्यांची ओळख मुख्याध्यापक श्री. संदीप पाळणी यांनी करून दिली व उपस्थितांचे आभार कु. धनश्री नाईक यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शाळेचे शिक्षक श्री .महेंद्र परब यांच्या मार्गदर्शनाखाली झाला.शेवटी शांती पाठने कार्यक्रम आटोपता घेण्यात आला.