पर्वरी वार्ताहर दि. ८ – पर्वरी येथील सुकूर पंचायतीच्या सभागृहात दिनांक ८ रोजी, संध्याकाळी पाच वाजता, पर्वरी रायझिंग क्लब तर्फे आयोजित व पर्यटन मंत्री रोहन खवटे यांच्या हस्ते जवळपास अडीचशे शालांत व उच्च शालांत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात मंत्री खवटे यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालनालयाचे संचालक शैलेश झिंगाडे, प्रमुख प्रवक्ता म्हणून गोवा समग्र शिक्षाचे कोऑर्डिनेटर जॉन सिलवेरा तिन्ही पंचायतीचे पंचमेंबर व पालक विद्यार्थी हजर होते. मान्यवरांची या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषणे झाली.
या कार्यक्रमात जवळपास अडीचशे दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले . बार्लिंग ओलंपिक स्पेशल मध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या गीतांजली नागवेकर, सिल्वर मेडल असलम बाबाजान, ब्रांझ मेडल काजोल जाधव व डेली फर्नांडिस यांचाही सत्कार करण्यात आला