*
जुलै, २०२३: भारतातील दुसऱ्या सर्वात जुन्या म्युच्युअल फंड कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडने आज कॅनरा रोबेको मल्टी कॅप फंडच्या लाँचची घोषणा केली. हे सोल्यूशन गुंतवणूकदारांना इक्विटी बाजारपेठांच्या क्षमतेचा फायदा घेण्याची संधी देते. या सोल्यूशनचा लार्ज, मिड व स्मॉल कॅप स्टॉक्समधील विविध गुंतवणूकांच्या माध्यमातून दीर्घकाळपर्यंत भांडवल वाढ करण्याचा मनसुबा आहे.
नवीन फंड ऑफर विविध मार्केट कॅपिटलायझेशनच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. पोर्टफोलिओचे सक्रिय व्यवस्थापन उत्तम कामगिरी करण्यास मदत करू शकते आणि विविधीकरणामुळे एकूण पोर्टफोलिओ जोखीम कमी होण्यास मदत होईल.
‘‘कॅनरा रोबेको मल्टी कॅप फंड गुंतवणूकीची एकरकमी व एसआयपी अशा दोन्ही पद्धतींच्या माध्यमातून दीर्घकाळापर्यंत मालमत्ता निर्माण करण्यासाठी उत्तम संधी असू शकते. जोखीम व रिवॉर्ड यामध्ये उत्तम संतुलनाचा शोध घेत असलेले आणि ५ वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीमध्ये विविध बाजारपेठ चक्रांच्या माध्यमातून गुंतवणूक करत राहण्यास सज्ज असलेल्या म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना भारताच्या विकासगाथेमधून फायदा होऊ शकतो, जेथे मार्केट कॅप्समधील कंपन्या या अद्वितीय संधीचा लाभ घेण्यास सज्ज आहेत,’’ असे कॅनरा रोबेको म्युच्युअल फंडचे सीईओ श्री. रजनीश नरूला म्हणाले.